Esakal
देश

Article 370 : "आता विश्वातील कोणतीही शक्ती....", कलम ३७० बाबत PM मोदींचं विरोधकांना थेट आव्हान

जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निर्णय दिला आहे

रोहित कणसे

जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निर्णय दिला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्याबाबत विरोधी पक्षांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विश्वातील कोणतीच शक्ती कलम ३७० पुन्हा लागू करू शकत नाही असं विधान केलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने निश्चीत केले आहे की देशात कुठल्याही स्थितीत दोन कायदे चालू शकत नाहीत. त्यांनी सांगितले खी कलम ३७० हटवणे कुठल्याही राजकारणापेक्षाही अधिक जम्मू-काश्मीर आणि लद्दाखच्या लोकांसाठी आवश्यक होते. जम्मू काश्मीरचा विकास आणि तेथील लोकांचे जीवन सोपं बनवण्यासाठी आवश्यक होतं.

पंतप्रधान मोदी यांनी पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रसवर देखील टीका केली, ते म्हणाले की परिवारवाद्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी ताब्यात घेण्यात आलं होतं, जम्मू-काश्मीर मधील सामन्य लोक या राजकारणाचा भाग नव्हते आणि ते बनू देखील इच्छित नाहीत. ते भूतकाळातील अडचणीतून बाहेर पडून सामान्य नागरिकांप्रमाणे कुठल्याही भेदभावाशिवाय आपल्या मुलांचे भविष्य आणि वर्तमान सुरक्षित करु इच्छितात.

पंतप्रधान मोदींनी दावा केला की कलम ३७० काढल्यानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच लद्दाख येथील चित्र पालटलं आहे. येथे सिनेमागृह सुरु झाले आहेत. तेथे दहशतवादी नव्हे तर पर्यटकांची जत्रा भरत आहे. तेथे दगडफेक नाही तर चित्रपटांची शुटिंग होत आहे. पीएम मोदी यांनी सांगितलं की राजकीय स्वार्थामध्ये लोक कलम ३७० बद्दल भ्रम पसरवत होते. त्यांना मी स्पष्टपणे सांगेन - आता विश्वातील कोणतीही शक्ती कलम ३७० परत आणू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT