ayodhya, ram mandir, ram mandir bhumi pujan, pm narendra modi speech  
देश

Modi Ayodhya Tour: PM मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर, मंदिराच्या तयारीचा घेणार आढावा; अयोध्येला छावणीचं रुप

१६ हजार कोटींच्या विकासकामांची पायाभरणी तसेच उद्घाटनं होणर आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शनिवारी) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी इथं सुरु असलेल्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत. यासाठी या नगरीला १६ हजार कोटींच्या विकास कामांचं पॅकेज मिळणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षेच्या कारणासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (PM Modi on Ayodhya visit tomorrow will review temple preparations)

कोणत्या विकासकामाची उद्घाटनं होणार?

पतंप्रधानांच्या दौऱ्यात विमानतळ, हायवे, रेल्वे स्टेशन आणि रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण या महत्वाच्या वाहतूक यंत्रणांच्या पायाभूत सुविधा अयोध्येत विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये रामजन्मभूमी मंदिराशी संबंधित विकासकामांवर विशेषतः लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.

यावेळी चार प्रमुख मार्गांचं लोकार्पणही होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये उत्तर प्रदेशातील काही योजनांचा समावेश आहे. मोदींच्या या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अविस्मरणीय समारंभ बनवण्याचे निर्देश दिले आहेत. (Marathi Tajya Batmya)

पंतप्रधान करणार संबोधित

मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करतील. या सभेला सुमारे २ लाख लोक हजेरी लावू शकतात. यावेळी गर्दीच्या नियंत्रणावर लक्ष केंद्रीत केलं जाईल. सभास्थळी आणि इतर प्रमख स्थळांवर तज्ज्ञांची नियुक्ती केली जातात. सुरक्षेच्या दृष्टीनं हवाई पाहाणी देखील होणार आहे. (Latest Marathi News)

'या' योजनांचं होणार भूमिपूजन

  1. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम एयरपोर्ट- 1463

  2. अयोध्या-जगदीशपुर महामार्ग- 2185

  3. जौनपुर-बाराबंकी रेल्वे लाइन दुपदरीकरण - 1919

  4. मल्हौर ते डालीगंज दुपदरीकरण विद्युतीकरण- 200

  5. राम पथ- 844.93

  6. भक्तपथ- 68.04

  7. धर्म पथ - 65.40

  8. एनएच-27 बाईपास से रामजन्मभूमि हायवे- 44.98

  9. बड़ी बुआ रेल्वे ओव्हरब्रीज- 74.25

  10. अयोध्या रेलवे स्टेशन पहिला फेज-241

  11. राजर्षि दशरथ मेडिकल कॉलेज - 245.64

या योजनांसह एकूण ३१ योजनांचा या समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT