देश

Khorasan Diary: कट्टरवादी मासिकाच्या कव्हर पेजवर नरेंद्र मोदी, अनेक भाजपनेते टार्गेटवर

'खुरासन डायरी' ने 14 जुलै रोजी ट्विटरवर इस्लामिक स्टेट खुरासन प्रांतचे (ISKP) कव्हर पेज शेअर केले होते.

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून, इस्लामिक मासिकात भाजप नेत्यांवरील हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबतची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यावर बिहार पोलीस मुख्यालयाने सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस मुख्यालयाकडून पत्र जारी करण्यात आले आहे.

जारी करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'खुरासन डायरी' ने 14 जुलै रोजी ट्विटरवर इस्लामिक स्टेट खुरासन प्रांतचे (ISKP) कव्हर पेज शेअर केले होते. त्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. त्याशिवाय या मासिकामध्ये व्हॉईस ऑफ खुरासन मासिकाने भारतीय जनता पक्षाविरोधातील हल्ल्याचा उल्लेख केला आहे. अशा स्थितीत मुखपृष्ठ आणि निवेदन प्रसिद्ध झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिसांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बिहार भाजपचे अनेक नेते आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये गिरीराज सिंह, अश्विनी चौबे, हरिभूषण ठाकूर बचौल, संजीव चौरसिया यांचा समावेश आहे. तर, अग्निपथ योजनेवरून नुकत्याच झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनाही Y श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय बिहारमधील टेरर मॉड्युलचा पर्दाफाश झाल्यानंतर देशातील मोठ्या एजन्सींनीही तपासकार्य वेगाने सुरू केले आहे. फुलवारी शरीफ टेरर मॉड्यूलमध्ये अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी अतहर परवेझच्या फोनमध्ये नुपूर शर्माचा नंबर आणि पत्ता सापडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू होती. तसेच बिहार भाजपमधील आठ नेतेही या लोकांच्या निशाण्यावर असल्याचे परवेझच्या फोनमधील माहितीवरून समोर आले आहे. त्यानंतर आता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रदीप पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी ठाण्यात तणाव! शिंदेसेनेकडून जोरदार घोषणाबाजी; कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत

Spain Train Crash: 'Minister Of Death' म्हणत उडाला संतापाचा भडका! ६८ बळींनंतर स्पेनमध्ये राजीनाम्यासाठी आंदोलन

PNB Bank Scam: पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा? FD मधून 35 कोटी गायब झाल्याचा आरोप; 5 कर्मचारी निलंबित, काय आहे प्रकरण?

मुलीच्या जन्मावेळेस लेबर रूममध्ये होता राज हंचनाळे; प्रत्यक्षात पाहिला पत्नीला झालेला त्रास, म्हणाला- ती सगळी प्रक्रिया बघितली आणि...

IPL 2027 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ; लसिथ मलिंगासह दोन भरवशाच्या सहकाऱ्यांनी सोडली साथ, हार्दिक पांड्याचं काय?

SCROLL FOR NEXT