

Shinde shivsena Aggresive in thane
ESakal
ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची हत्या केल्याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्याकांडाला महिना उलटला असून अद्यापही आरोपी माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदेंना पुरावे असूनही अटक करण्यात आली नाही. यामुळे पुर्णेकर कुटुंबिय आणि समर्थकांकडून ठाण्यात जोरदार आंदोलन केलं जात असताना आता ठाण्यात टेंभीनाका परिसरात शिंदेसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.