Pariksha Pe Charha 
देश

Pariksha Pe Charcha: "मुलांना इतरांची उदाहरणं देऊ नका"; PM मोदींनी 'परीक्षा पे चर्चा'मध्ये केलं पालकांना आवाहन

ताण-तणावाला विद्यार्थ्यांनी कसं समोरं जायचं? या विषयावर भाष्य करताना मोदींनी पालक आणि शिक्षकांनाही काही सूचना केल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ताण-तणावाला विद्यार्थ्यांनी कसं समोरं जायचं? या विषयावर भाष्य करताना मोदींनी पालक आणि शिक्षकांनाही काही सूचना केल्या आहेत. (PM Modi Pariksha Pe Charcha says Parents should avoid giving their children examples of other children)

पालकांना आवाहन

पालकांना महत्वाचं आवाहन करताना मोदी म्हणाले, अनेक पालक आपल्या पाल्यांना इतर मुलांची उदाहरणं देतात. पालकांनी अशा गोष्टी करणं टाळायला हवं. मी असेही पालक पाहिले आहेत की जे आपल्या आयुष्यात जास्त यशस्वी ठरले नाहीत किंवा त्यांनी महत्वाची कामगिरी केली नाही. पण त्यांनी आपल्या मुलांचं रिपोर्ट कार्ड हे आपलं व्हिजिटिंग कार्ड म्हणून घडवलं. जेव्हा केव्हा ते एखाद्याला भेटतात तेव्हा ते आपल्या मुलांची गोष्ट इतरांना सांगतात. (Latest Marathi News)

शिक्षकांना आवाहन

विद्यार्थ्यांचा तणाव कसा दूर करायचा असा विचार जर शिक्षक करत असतील तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की, विद्यार्थ्यांशी असलेलं तुमचं नात हे पहिल्या दिवसापासून परीक्षेच्या पहिल्या दिवसापर्यंत वृधिंगत व्हायला हवं. त्यामुळं त्यांना परीक्षेत तणाव होणार नाही. यामुळं शिक्षकांचंही विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाव्यतिरिक्त चांगलं नात निर्माण होईल. यामुळं विद्यार्थीही देखील तुम्हाला त्यांचे विचार आणि छोट्यामोठ्या अडचणी शेअर करतील. (Marathi Tajya Batmya)

विद्यार्थ्यांना दिला सल्ला

विद्यार्थ्यांना सल्ला देताना मोदी म्हणाले, तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी मोबाईल फोनचा वापर करतात. काहीजण असे असतील ज्यांना तासन् तास मोबाईल पाहण्याची सवल लागली आहे. पण हे दररोज वापरल्या जाणाऱ्या मोबाईललाही चार्ज करावं लागतं. जर मोबाईलला चार्जिंग करावं लागतं तर आपल्या शरिराला देखील केलं पाहिजे. (Latest Marathi News)

तसेच तुम्ही जेवढा जास्त सराव कराल तेवढा तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. पाण्याची खोली किती असेल यानं काही फरक पडत नाही. एकदा तुम्हाला कळालं की पोहायचं कसं तर तुम्ही सहज त्या खोल पण्यातही तग धरु शकता. त्याचप्रकारे प्रश्नपत्रिका कितीही अवघड असू देत तुम्ही चांगला सराव केला असेल तर तुमची कामगिरीही उत्तमच असेल. इतर लोक काय करतात याचा विचार करत बसू नका, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bapu Pathare: १०० लोक जमा केले अन्...; बापू पठारेंना मारहाण का झाली? पत्रकार परिषदेत आमदारांनी संपूर्ण विषयच उलगडून सांगितला!

दिवाळीत Invitation Cards बनवायचयं? तर Google Geminiचे 'हे' प्रॉम्प्ट वापरा

World Cup 2025: भारताने जिंकलेला टॉस? पण पाकिस्तानी कर्णधार राहिली चूप; IND vs PAK सामन्यापूर्वीच वादग्रस्त घटना; Video

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: विजेच्या धक्क्याने मुलगा जखमी

SCROLL FOR NEXT