PM Modi Phone Call to Vice President Jagdeep Dhankhar On MP mimicking as rahul gandhi took Video  eSakal
देश

Jagdeep Dhankhar : मी सुद्धा २० वर्षांपासून असाच अपमान सहन करतोय... नकलेवरून मोदींनी केला उपराष्ट्रपतींना फोन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षातील 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

रोहित कणसे

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षातील 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यादरम्यान निलंबीत झालेले खासदार संसद परिसरात आंदोलन करत असताना टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांची नक्कल केली. यावरून राजकारण तापताना दिसत आहे.

दरम्यान याप्रकणाची गंभीर दखल घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. काल संसदेच्या बाहेर खासदारांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी वीस वर्षांपासून असा अपमान सहन करत आहे. भारताच्या उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक कार्यालयात आणि तेही संसदेत घडणे हे दुर्दैवी असून काही लोकांच्या अशा कृत्याने मला माझे कर्तव्य पार पाडण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

दरम्यान आपल्या संविधानात दिलेल्या तत्त्वांचे पालन करण्यापासून मला रोखता येणार नाही. कोणताही अपमान मला माझ्या कामाचा मार्ग बदलण्यास प्रवृत्त करू शकत नाही, अशा भावना उपराष्ट्रपती यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या.

नेमकं काय झालं?

राज्यसभेतील कामकाजादरम्यान जगदीप धनखड यांनी केलेल्या कृतीची नक्कल कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या परिसरात करुन दाखवली. यावेळी त्यांच्या शेजारी अनेक खासदार तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देखील उपस्थित होते. कल्याण बॅनर्जी यांच्या कृतीला इतर खासदार दाद देत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर भाजपकडून या प्रकारावर टीका करण्यात आली होती.

तसेच उपराष्ट्रपतींनी या प्रकाराला लज्जास्पद म्हटलं होतं. हा सर्व प्रकार अस्वीकार्य आहे की एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार त्याचा व्हिडिओ बनवत आहे. पातळी सोडण्याची काही मर्यादा असते. मी एक व्हिडिओ पाहिला. त्यात एक खासदार माझी नक्कल करत आहेत. दुसरा त्याचा व्हिडिओ करत आहे. त्यांना सदबुद्धी देवो. काही ठिकाणांना तरी सोडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT