pm modi on Certificate Esakal
देश

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Corona Vaccine Certificate: भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोना विषाणू प्रतिबंधक लस कोविशिल्डचे काही दुष्परिणाम असल्याचं समोर आलं आहे. यामुळे मोठा वाद देखील निर्माण झाला आहे. त्यातच भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. कोविड-१९ लसीच्या सर्टिफिकेटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यात आला आहे.

देशात मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण झालं आहे. या सगळ्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं जातं. भाजप नेत्यांनी याचा जोरदार प्रचार केला होता. मात्र, कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने यूकेच्या कोर्टामध्ये दुष्परिणामांबाबत कबुली दिली आहे. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने हे मोठं पाऊल उचलल्याची चर्चा सुरु आहे.

कोविशिल्ड लस घेतल्याने थ्रोम्बोसिससोबत थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) होतो असं कंपनीने कबुलं केलं आहे. अनेक भारतीय लोकांनी आपलं कोरोना सर्टिफिकेट तपासलं असता त्यांना पंतप्रधान मोदी यांचा फोटा दिसला नाही. याठिकाणी क्यूआर कोड दिसत आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने हा फोटो हटवला असल्याचं स्पष्ट आहे. द हिंदूने यासंदर्भातील बातमी दिली आहे. (Photo of PM Modi removed from Corona vaccine certificate)

आरोग्य मंत्रालयाने काय सांगितलं?

पंतप्रधान मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याने सोशल मीडियावर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय की, सध्या लोकसभा निवडणुका सुरु असल्याने आचारसंहिता सुरु आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सर्टिफिकेटवरुन हटवण्यात आला आहे. 'द प्रिंट'ला आरोग्य मंत्रालयाने ही प्रतिक्रिया दिली आहे.

याआधीही हटवण्यात आलाय फोटो!

पंतप्रधान मोदी यांचा फोटो सर्टिफिकेटवरुन हटवण्यात आल्याची ही पहिली वेळ नाही. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा येथे निवडणुकीच्या दरम्यान मोदींचा फोटो सर्टिफिकेटवरुन काढण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. पण, सध्याच्या या घटनेला एस्ट्राजेनेका कंपनीने दिलेल्या कबुलीसोबत जोडून पाहिलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT