PM Modi in Pune eSakal
देश

PM Modi in Pune : मोदींचा पुणे दौरा केवढ्याला पडणार? पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एका दिवसाला किती येतो खर्च?

PM Modi Security : पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणाऱ्या एसपीजीच्या बजेटमध्ये यावर्षी कपात करण्यात आली आहे.

Sudesh

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी दररोज मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. जेव्हा पंतप्रधान एखाद्या राज्याच्या दौऱ्यावर जातात, तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी एसपीजी, एएसएल या सुरक्षा यंत्रणा आणि राज्य व स्थानिक पोलीस प्रशासन तैनात केलं जातं.

असा असतो ताफा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः एका बुलेटप्रूफ कारमध्ये असतात. त्यांच्या सुरक्षा ताफ्यामध्ये सुमारे 19 गाड्या असतात. यात दोन आर्मर्ड गाड्या, नऊ हायप्रोफाईल गाड्या, रुग्णवाहिका आणि डमी कार्स यांचा समावेश असतो. त्यांच्यासोबत सुमारे 100 जवान असतात.

जॅमर कार

यासोबतच, पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये एक जॅमर असणारी गाडीही असते. या गाडीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे रेडिओ किंवा रिमोट कंट्रोल डिव्हाईस जॅम होऊन जातात. रिमोटच्या माध्यमातून होणारे IED बॉम्ब हल्ले रोखण्यासाठी ही गाडी फायद्याची ठरते. (Pune News)

मोदींसोबत आलेल्या राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रमुख नेते, अग्निशामक वाहन आणि शासकीय अधिकाऱ्यांची वाहने असं सगळं मिळून हा ताफा सुमारे 30 ते 35 वाहनांचा होतो. (PM Modi Security)

किती होतो खर्च?

पंतप्रधान मोदींनी एसपीजी सुरक्षा दिली जाते. यापूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही एसपीजी सुरक्षा देण्यात येत होती. मात्र, आता केवळ पंतप्रधान मोदींनाच ही सुरक्षा दिली जाते. 2020-21 साली एसपीजीचं वार्षिक बजेट हे 429.05 कोटी रुपये होतं. 2022-23 मध्ये एसपीजीचं बजेट कमी करून, 385.95 कोटी करण्यात आलं आहे. म्हणजेच, पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी एका दिवसाला 1.17 कोटी रुपये खर्च होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT