PM Modi Rajya Sabha Speech : Sakal
देश

PM Modi in Rajya Sabha : 'मला कोणतेही आरक्षण पसंत नाही, नोकरीत तर नाहीच', PM मोदींनी वाचून दाखवलं नेहरूंचं पत्र

PM Modi Rajya Sabha Speech : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत बोलतान विरोधी पक्ष काँग्रेसवर घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळाले.

रोहित कणसे

PM Modi Rajya Sabha Speech Latest News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत बोलतान विरोधी पक्ष काँग्रेसवर घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका पत्राचे वाचन करत मोदींनी काँग्रेस जन्मजात आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जर आपल्याला २१ शतकात आपल्याला विकसीत भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर २०व्या शतकातील विचार चालणार नाहीत. २०व्या शतकातील स्वार्थी अजेंडा देशाला विकसीत करु शकत नाही.

काँग्रेसकडून जातीबद्दल बऱ्याच गोष्टी बोलत आहे. त्यांना जातीविषयी बोलायचे असेल तर त्यांनी स्वतःकडे एकदा पाहावे, त्यांनी स्वतः काय केले आहे ते कळेल. दलित, मागास आणि आदिवासी यांची काँग्रेस जन्मजात विरोधक आहे. मला कधी तरी वाटतं बाबासाहेब नसते तर एससी एसटींना आरक्षण मिळालं असतं की नसतं हा प्रश्न देखील मला पडतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यांचे विचार आत्ताच नव्हे तर आधीपासूनच तसे आहेत माझ्याकडे त्याचा पुरावा देखील आहे. एकदा नेहरूंनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीलं होतं. मी त्या पत्राचा अनुवाद वाचत आहे. मला कुठल्याही प्रकारचे आरक्षण पसंत नाही, विशेषतः नोकऱ्यांमधील आरक्षण तर कधीच नाही. मी अशा कुठल्याही निर्णयाच्या विरोधात आहे जो अकुशलतेच्या वाढीस चालना देईल. जो दुय्यम दर्जाकडे घेऊन जाईल. ही पंडीत नेहरूंनी देशातील मुख्यमंत्र्यांनी लिहीलेलं पत्र आहे. त्यामुळे हे जन्मजात आरक्षणाच्या विरोधी आहेत असं मी म्हणतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नेहरु म्हणत असत की एसटी, एससी, ओबीसींना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं तर कामाचा स्तर खाली जाईल. हे लोकं (काँग्रेस) जेव्हा आकडे सांगतात त्याचं मुळ इथे आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

नेहरूनी जे सांगितलं ते काँग्रेससाठी काळ्या दगडावरील रेघ असते. दाखवण्यासाठी तुम्ही काही म्हणालात तरी तुमचे विचार अशा अनेक उदाहरणांनी सिद्ध होते असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : MPSC विद्यार्थ्यांचं 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT