देश

जम्मू-काश्मीर बैठक: राज्याचा दर्जा देण्याचं मोदींचं आश्वासन

विनायक होगाडे

नवी दिल्ली : मोदी आणि काश्मीरी नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास चर्चा झाली आहे. कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच अशी सविस्तर बैठक झाली आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक सुरु झाली होती. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.

जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याची माहिती काश्मीरी नेत्यांनी दिली आहे. मतदार पुनर्रचनेनंतर निवडणुका घेतल्या जातील, असंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. जम्मू काश्मीरमधील वार्ड पुनरर्चनेत स्थानिक नेत्यांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन मोदींनी या बैठकीत केल्याचं समजत आहे.

यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय की, राजकीय मतभेद असतील पण प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी काम केले पाहिजे जेणेकरून जम्मू-काश्मीरच्या लोकांना फायदा होईल. जम्मू-काश्मीरमधील सर्वांसाठी सरंक्षण आणि सुरक्षिततेचे वातावरण सुनिश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी म्हटलंय की त्यांना 'दिल्ली की दुरी' आणि 'दिल की दुरी' काढून टाकायची आहे.

यावेळी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय की, जवळजवळ 80 टक्के पक्ष कलम 370 वर बोलले. मात्र, हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. काँग्रेसच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. लवकरात लवकर संपूर्ण राज्याचे दर्जा, लोकशाही स्थापन करण्यासाठी निवडणुका, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, सर्व राजकीय अटकेत असलेल्यांना सोडण्यात यावं आणि जमीन, रोजगाराची हमी देण्यात यावी या सर्व गोष्टींचा समावेश आहे.

जम्मू काश्मीरमधील अपनी पार्टीचे नेता अल्ताफ बुखारी यांनी म्हटलं की, चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात पार पडली. पंतप्रधानांनी सगळ्या नेत्यांचे मुद्दे ऐकून घेतले. त्यांनी म्हटलंय की, वार्ड पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली जाईल. पुढे त्यांनी म्हटलंय की, पुनर्रचनेची प्रक्रियेची अंतिम तारीख अद्याप ठरलेली नाहीये. याशिवाय लवकच निवडणूका करण्याबाबत देखील चर्चा पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT