PM Modi
PM Modi  sakal
देश

‘डबल इंजिन’मुळे वेगाने विकास; पंतप्रधान मोदींचा दावा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मणिपूरच्या विकासाच्या(manipur) आड येणारे सर्व अडथळे दूर झाले असून या राज्याचा विकास वेगाने सुरु आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi)यांनी आज केला. या राज्याला गेली ७० वर्षे अविकसीत ठेवणाऱ्या शक्तींना डोके वर काढू देऊ नका, असे आवाहन त्यांनी आज केले. विकासाच्या ‘डबल इंजिन’मुळे राज्याच्या विकास वेगाने होत असल्याचेही मोदी म्हणाले.

मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होत असून आज या राज्याचा स्थापना दिवसही आहे. ही संधी साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून मणिपूरच्या जनतेशी संवाद साधला. स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की,‘‘मणिपूरमधील जनतेचा शांतता आणि विकासावर हक्क आहे. वारंवार होणारे बंद, रास्ता रोको यांपासूनही सुटका मिळविण्याचा त्यांना हक्क आहे. हे सर्व त्यांना मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली मिळाले आहे. ’’ मणिपूरमध्ये सध्या भाजप सत्तेवर आहे. या राज्यात २७ फेब्रुवारी आणि तीन मार्च अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. मोदी म्हणाले,‘‘मणिपूरच्या विकासाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून हा राज्याच्या विकासाचा अमृतकाळ आहे. मणिपूरला देशाचे क्रीडाकेंद्र बनविण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; संभाजीनगर-वडगाव शेरीमध्ये नागरिक खोळंबले

High Court : माजी सहकारमंत्र्यांचा 'तो' आदेश न्यायालयाकडून रद्द; 'जय भवानी'च्या चौकशीचा मार्ग मोकळा

मतदार यादीतून तुमचे नाव वगळले आहे का? 2 कागदपत्रांसह ‘येथे’ फार्म नंबर-6 भरा, 7 दिवसात समाविष्ठ होईल नाव; लोकसभेला मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी

Sakal Podcast: महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

Latest Marathi News Live Update : प्रज्वलला आणण्यासाठी एसआयटी परदेशात जाणार नाही - गृहमंत्री परमेश्वर

SCROLL FOR NEXT