PM Modi.
PM Modi. 
देश

'बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी मी केलेला सत्याग्रह'; PM मोदींनी अभिमानाने सांगितली आठवण

सकाळवृत्तसेवा

ढाका : बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांत आधी सावरमधील राष्ट्रीय शहीद स्मारकला भेट दिली आणि 1971 मधील बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान वंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या मुलींना गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे की, आम्हाला शेख मुजीबुर रहमान यांना गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्याची संधी मिळाली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, मी बांग्लादेशच्या बंधुभगिनींना अभिमानाने सांगू इच्छितो की, मी 20-22 वर्षांचा असताना बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्या संघर्षामध्ये सहभागी होणं माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनामधील एक होतं. माझं वय तेंव्हा 20-22 वर्षे होतं जेंव्हा मी आणि माझ्या काही साथींनी बांग्लादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. आज भारत आणि बांग्लादेश दोन्हीही देशांच्या सरकारांनी या संवेदनशीलतेला ओळखून या दिशेने चांगल्या पद्धतीने वाटचाल करत आहे. परस्परांतील विश्वास आणि सहयोगानेच योग्य वाटचाल करता येऊ शकते. Land Boundary Agreement याचाच एक पुरावा आहे. 

दहशतवादाचा केला उल्लेख
पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदींनी यावेळी पाकवर निशाणा देखील साधला आहे. त्यांनी म्हटलं की, व्यापार आणि उद्योगामध्ये एकीकडे समान संधी आहेत, तर दुसरीकडे दहशतवादासारखी आव्हाने देखील आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आठवणीचा दिवस असेल. बांग्लादेशने मला या आयोजनात सहभागी करुन घेतलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. भारत या गोष्टीमुळे आनंदीत आहे की,  भारतात निर्माण झालेली लस बांग्लादेशच्या लोकांच्या उपचाराकरता वापरण्यात येत आहे.   

पुढे मोदींनी म्हटलं की, इथल्या लोकांवरील पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार आम्हाला व्यथित करायचे. अनेक दिवसांपर्यंत या अत्याचारांच्या फोटोंनी झोप लागत नव्हती. बांग्लादेशच्या स्वातंत्र्य संग्रामाला समाजातील प्रत्येक वर्गाकडून समर्थन प्राप्त झालं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रयत्न आणि त्यांची महत्त्वपूर्ण भुमिका देखील सर्वज्ञात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT