देश

Narendra Modi : ''नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा'', पंतप्रधान मोदींकडून दोन मोठ्या घोषणा

संतोष कानडे

सिंधुदुर्गः नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तारकर्ली इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणत्याही देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत.

मोदी पुढे म्हणाले, भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

मोदी पुढे म्हणाले की, सशस्त्र दलांमध्ये नारीशक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. नौसेनेचं अभिनंदन करतो, की नेव्हलशीपमध्ये देशातल्या पहिल्या महिला कमांडर ऑफिसरची नियुक्ती केली आहे. शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना बोट बनवण्याची कला पुन्हा विकसित करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT