PM Modi Slam Congress During Lok sabha Election campaign in Jaipur Marathi Political News  
देश

PM Modi On Congress : काँग्रेसने केलेल्या पापांची शिक्षाच जनता त्यांना देतोय; पंतप्रधान मोदांचा हल्लाबोल

देशाची २०१४ पूर्वी जी स्थिती होती, ती पुन्हा येऊ नये अशीच जनतेची इच्छा आहे, असा दावाही मोदींनी केला.

सकाळ वृत्तसेवा

जयपूर, ता. २१ (पीटीआय) : ‘‘काँग्रेसने केलेल्या पापांची शिक्षाच जनता त्यांना देत आहे. ज्या पक्षाने एकेकाळी चारशेंहून अधिक जागा जिंकल्या होत्या; त्यांची आता तीनशे जागा लढण्याचीही क्षमता नाही,’’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मारला. देशाची २०१४ पूर्वी जी स्थिती होती, ती पुन्हा येऊ नये अशीच जनतेची इच्छा आहे, असा दावाही मोदींनी केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात आले होते. येथील सभेत ते म्हणाले,‘‘निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अर्ध्या राजस्थानने काँग्रेसला शिक्षा केली आहे. देशाला सामर्थ्यवान बनविणे काँग्रेसला शक्य नाही, हे कायम देशभक्तीचे वारे वाहणाऱ्या राजस्थानला पक्के माहिती आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीची वाळवी सर्वत्र पसरवून काँग्रेसने देशाला पोकळ केले होते. त्यांच्या या कृत्याची देशातील जनतेला चीड असून या पापाबद्दल त्यांना शिक्षा होत आहे. काँग्रेसची आताची जी स्थिती आहे, तिला हा पक्ष स्वत:च कारणीभूत आहे.

‘राहुल घेताहेत मतदारसंघाचा शोध’


नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वायनाडमधून विजय होईलच, याची काँग्रेस पक्षालाच खात्री नसल्याने ते राहुल यांच्यासाठी आणखी एक मतदारसंघ शोधत आहेत, असा दावा नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीदरम्यान केला. २६ एप्रिलनंतर या नव्या मतदारसंघाची घोषणा होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. वायनाडमध्ये २६ एप्रिलला मतदान होणार आहे.

मुलाखतीमध्ये मोदी म्हणाले,‘‘काँग्रेसच्या युवराजांनी उत्तरेतून पळ काढला आणि दक्षिणेत आश्रय घेतला. मात्र, वायनाडमध्ये त्यांना विजयाची खात्री नसल्याने लवकरच दुसरा मतदारसंघ घोषित होईल, याची ते वाट पाहात आहेत. वायनाडमध्ये मतदान झाल्यावर ही घोषणा होईल. माझे हे शब्द लक्षात ठेवा. मी मागे एकदा संसदेत म्हणालो होतो की काँग्रेसचे मोठे नेते लोकसभा लढणार नाहीत, ते राज्यसभेत जातील. माझ्या या विधानानंतर एकाच महिन्यात सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पराभव आधीच स्वीकारला होता. त्यामुळे यावेळीही तसेच होईल, अशी मला खात्री आहे.’’

अमेठी, रायबरेलीकडे लक्ष


काँग्रेसने अद्याप उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पक्षाने निर्णय घेतल्यास अमेठीतूनही लढू, असे राहुल यांनी म्हटले होते. त्यामुळे, राहुल हे पुन्हा एकदा अमेठीतून लढणार का? तसेच, प्रियांका गांधी रायबरेलीतून मैदानात उतरणार का? याबाबत कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे विरोधक त्यांना डिवचत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : आमदार निवासातील कँटिन चालकाला दणका, अन्न व औषध प्रशासनाने केली मोठी कारवाई

Hemant Rasane : पुणेकरांना करात सरसकट सवलत मिळावी; आमदार रासने यांची विधानसभेत मागणी

Aamir Khan: दोन लग्नांनंतर आमिर पुन्हा प्रेमात? सोशल मीडियावर आमिर-गौरी प्रेक्षकांकडून ट्रोल

Belgaum : धक्कादायक! सोने व्यापारातून सोन्यासारखा संसार उद्धवस्त, एकाच कुटुंबातील चौघांनी उचललं टोकाचं पाऊल; चिट्टीतून मोठा खुलासा

Injection intoxication : काेल्हापुरातील धक्कादायक प्रकार! 'तरुणाईत नशेच्या इंजेक्शनचा वापर वाढला'; सांगलीतून हाेतेय खरेदी

SCROLL FOR NEXT