PM-Narendra-Modi sakal
देश

मोदी घेणार 'सात' लस उत्पादकांची भेट; महत्वाच्या निर्णयाची शक्यता

१०० कोटी डोसच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सात लस उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची आज (शनिवार) भेट घेणार आहेत. या बैठकीत लसीकरण मोहिमेसंदर्भात काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जिनोव्हा बायोफार्मा आणि पॅनासी बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या बैठकीत जे लोक लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांचं लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्यावर तसेच 'व्हॅक्सिन मैत्री' प्रकल्पांतर्गत विदेशात लस पाठवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशात सध्या १०१.३० कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी ७ वाजताच्या बुलेटिनद्वारे दिली. दोनच दिवसांपूर्वी भारतानं कोविड लसीकरण मोहिमेत १०० कोटी डोस पूर्ण करत एक महत्वाचा टप्पा पार केला. देशातील विविध भागांमध्ये सरकारकडून याचं सेलिब्रेशनही करण्यात आलं.

या लसीकरण मोहिमेत भारतातील ७५ टक्क्यांहून अधिक लोकांनी कमीत कमी एक डोस घेतला आहे. यांपैकी नऊ राज्ये आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व पात्र लोकांना शंभर टक्के पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच एकूण पात्र ९३ कोटी लोकसंख्येपैकी ३१ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात सार्वत्रिक लसीकरण मोहितेंतर्गत सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन लस देण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

SCROLL FOR NEXT