PM Modi UAE Visit esakal
देश

PM Modi UAE Visit : दुबईला आश्चर्यांचं शहर का म्हटलं जातं? जाणून घ्या ही 7 कारणं

भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात अनेक दशके जुने सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध

Anuradha Vipat

PM Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान आधी फ्रान्सला पोहोचतील आणि नंतर यूएईला रवाना होतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात अनेक दशके जुने सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत.

1966 मध्ये अबू धाबीचे शासक शेख झायेद बिन सुलतान अल नाह्यान यांच्या राज्याभिषेकानंतर आणि 1971 नंतर संबंध सुधारले. गेल्या काही वर्षांत ऊर्जा, संरक्षण, अंतराळ, सुरक्षा आणि व्यापार या क्षेत्रांत संबंध सुधारले आहेत.

आता यूएई म्हटलं की दुबईची आठवण होते. हे शहर तिथल्या आश्चर्यांसाठी ओळखलं जातं. लक्झरी लाईफसाठी दुबई प्रसिद्ध आहे. दुबई UAE च्या सर्वोत्तम शहरांमध्ये गणलं जातं. याची अनेक कारणं आहेत. जसं की, मॉडर्न लक्झरी सिटी, अल्ट्रा मॉडर्न बिल्डिंग आणि आर्किटेक्चरमुळे ते इतर शहरांपेक्षा वेगळे आहे. जाणून घ्या दुबईशी संबंधित आश्चर्यकारक गोष्टी...

जगातील सर्वात मोठा मॉल: 1200 स्टोअर्स, 26 सिनेमा हॉल आणि 120 रेस्टॉरंट्स

जगातील सर्वात मोठ्या मॉलचा विक्रम दुबईच्या नावावर आहे. येथील दुबई मॉल 12 दशलक्ष स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे. त्यात 1200 दुकाने आहेत. 26 सिनेमा स्क्रीन असलेल्या या मॉलमध्ये 120 हून अधिक कॅफे आणि रेस्टॉरंट आहेत. जे आपल्या कलाकुसरीसाठीही प्रसिद्ध आहे.

जगातील सर्वात मोठं मत्स्यालय: 10 दशलक्ष लिटरमध्ये 33 हजार प्रजाती

जगातील सर्वात मोठे मत्स्यालय दुबईमध्ये आहे, ज्याला दुबई एक्वेरियम टँक म्हणून ओळखले जाते. त्याची क्षमता एक कोटी लिटर पाण्याची आहे. हे दुबई मॉलच्या तळमजल्यावर आहे. त्यात खास प्रकारचे सॅन्ड टायगर शार्क आहेत. मत्स्यालयात 33 हजारांहून अधिक जलचर प्राण्यांच्या 200 प्रजाती आहेत.

जगातील सर्वात उंच फोटो फ्रेम: 492 फूट उंच फ्रेम

जगातील सर्वात उंच फोटो फ्रेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईमध्येच अशी फ्रेम बसवण्यात आली आहे. हे 492 फूट उंच आहे, जे इथल्या पर्यटकांना खूप आवडते.

इनडोअर स्कीइंग: थंड प्रदेशात पोहोचल्यासारखं वाटतं

स्कीइंगसाठी जगातील सर्व ठिकाणांपेक्षा दुबईमधील इनडोअर स्कीइंग खूप लोकप्रिय आहे. हे दुबईच्या एमिरेट्स मॉलमध्ये बनवण्यात आले आहे, ज्यामुळे एखाद्याला थंड प्रदेशात गेल्यासारखे वाटते.

3 आयफेल टॉवर इतकी जगातील सर्वात उंच इमारत

दुबई हे 828 मीटर उंच बुर्ज खलिफा या इमारतीसाठी ओळखले जाते. त्याची उंची 3 आयफेल टॉवर्सएवढी आहे. बुर्ज खलिफा किती भव्य आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येतो की, त्याची साफसफाई करण्यासाठी 36 कामगार लागतात आणि 3 महिने साफसफाई सुरू असते.

दुबई डिनो

जर तुम्हाला विज्ञान, प्राणी आणि जीवाश्म आवडत असतील तर दुबई डिनो तुमच्यासाठी आहे. दुबई मॉलमध्ये 15.5 दशलक्ष वर्ष जुने डायनासोरचे जीवाश्म प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. हे जगातील दुर्मिळ जीवाश्मांपैकी एक आहे.

इनडोअर थीम पार्क

दुबई हे जगातील सर्वात मोठ्या इनडोअर थीम पार्कसाठी ओळखले जाते. येथील IMG वर्ल्ड ऑफ अॅडव्हेंचर 1.5 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. ज्यामध्ये एका दिवसात 20 हजार लोक पोहोचू शकतात. 17 थीम राईड्स आहेत ज्यामध्ये विविध प्रकारचे कार्टून कॅरेक्टर वापरण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT