PM Modi interacts with landslide survivors in Wayanad 
देश

PM Modi Visits Wayanad : पंतप्रधानांसमोर व्यथा मांडताना अश्रू अनावर, हवाई पाहणीनंतर मोदींनी वायनाडमध्ये घेतली पीडितांची भेट

PM Modi visits landslide-affected Wayanad : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडमधील भूस्खलन ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली होती

सकाळ वृत्तसेवा

वायनाड, ता.१० (पीटीआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी करत प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देत पीडितांच्या व्यथा जाणून घेतल्या. मोदींनी चुरालमाला येथील निर्वासितांच्या छावणीला भेट देत त्यांची विचारपूस केली. पंतप्रधानांचे आज सकाळीच हेलिकॉप्टरने कन्नूर विमानतळावर आगमन झाले होते. हवाई पाहणी आटोपून त्यांनी थेट भूस्खलनग्रस्त भागाकडे धाव घेतली. त्यांनी अडीचच्या सुमारास मेप्पाडी येथील पीडितांच्या छावणीला भेट दिली. येथे त्यांनी जवळपास अर्धा तास स्थानिकांशी संवाद साधला.

या नैसर्गिक संकटामध्ये सर्वस्व गमावलेल्या पीडितांना पंतप्रधानांसमोर व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते. मोदींनीही त्यांना या संकटाचा धैर्याने मुकाबला करा असे सांगत त्यांचे सांत्वन केले. तत्पूर्वी त्यांनी चुरालमला, मुंडक्कई आणि पुंचीरिमथ्थम या भूस्खलनग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री पी.विजयन हे देखील उपस्थित होते. ही हवाई पाहणी आटोपूनच त्यांनी चुरालमला येथील निर्वासितांच्या छावणीच्या दिशेने धाव घेतली. याच भागामध्ये लष्कराने १९० फूट लांबीचा पूल उभारला आहे. पंतप्रधानांनी या पुलावरून चालत जात परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यपाल आरिफ मोहंमद खान, केंद्रीयमंत्री सुरेश गोपी आदी उपस्थित होते. दरम्यान येथील भूस्खलनामध्ये २२६ लोकांनी प्राण गमावले असून आणखी १३० जण बेपत्ता आहेत.

तेव्हाचे उत्तर चर्चेत

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाडमधील भूस्खलन ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली होती पण प्रत्यक्षात काँग्रेसच्याच राजवटीमध्ये (२०१३) तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय आपत्तीसारख्या संकल्पनेचा कायद्यामध्ये समावेश नसल्याचे उत्तर संसदेमध्ये दिले होते अशी माहिती आज सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. संबंधित आपत्तीची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून अतिरिक्त मदत दिली जाऊ शकते असे तत्कालीन सरकारचे म्हणणे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT