Priyanka Gandhi, Narendra Modi esakal
देश

Modi Vs Gandhi: वाराणसीतून PM मोदी विरुद्ध प्रियंका गांधी?; लोकसभेसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

देशातील २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशातील २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. यामध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे अमेठी इथून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केली आहे. तसेच प्रियंका गांधी देखील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. (PM Modi vs Priyanka Gandhi may Election in Varanasi for 2024 LokSabha says Congress leader Ajay Rai)

अजय राय यांची नियुक्ती

काँग्रेसकडून अजय राय यांची नुकतीच उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर उत्तर प्रदेशात त्यांचं समर्थकांकडून स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राय यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे कुठल्या मतदारसंघातून लढणार? असा प्रश्न विचारला. (Latest Marathi News)

यावर उत्तर देताना राय म्हणाले, राहुल गांधी हे अमेठीतून लढणार आहेत. तर प्रियंका गांधी यांची जिथून लढण्याची इच्छा असेल तिथून किंवा वाराणसीमधून लढायची त्यांची इच्छा असेल तर आमचा एक-एक कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवतोड प्रयत्न करेल. (Marathi Tajya Batmya)

राहुल गांधींचा झाला होता पराभव

दरम्यान, राहुल गांधी यांनी गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 'अमेठी' आणि केरळमधील 'वायनाड' या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये अमेठीतून राहुल गांधींविरोधात भाजपनं स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये इराणींचा विजय झाला होता तर राहुल गांधींना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण राहुल गांधी वायनाडमधून निवडून आले होते, त्यामुळं त्यांनी संसदेतील आपली जागा राखली होती.

प्रियंका गांधींचा करिश्मा फेल

तर प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेसनं पहिल्यांदाच सरचिटणीसपदी नियुक्ती करत उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली होती. भाजपला शह देण्यासाठी प्रियंका गांधींचा करिश्मा निर्णायक ठरेल असंही त्यावेळी बोललं गेलं होतं. पण प्रत्यक्षात तसं होऊ शकलं नाही आणि काँग्रेसला उत्तर प्रदेशात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. उत्तर प्रदेशात काँग्रेसला लोकसभेच्या केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT