pm Modi writes to Akanksha who brought him his sketch at his event in Kanker Chhattisgarh on 2nd November  
देश

PM Narendra Modi : पीएम मोदींनी आठवणीनं लिहीलं 'त्या' १० वर्षांच्या चिमुरडीला पत्र; म्हणाले...

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांकेर येथील राहणाऱ्या आकांक्षा ठाकूरला आठवणीने पत्र लिहीलं आहे. आकांक्षा ठाकूर ही चिमुरडी दोन नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील कांकेर येथे झालेल्या पीएम नरेंद्र मोदी यांच्या सभेला त्यांचं स्केच घेऊन गेली होती. तेव्हा पंतप्रधानांनी ते स्केच स्वीकारलं होतं. यावेळी त्यांनी त्या स्केचच्या मागे तिला स्वतःचा पत्ता लिहायला सांगितला होता, तसेच मी तुला पत्र लिहीन असं अश्वासन देखील दिलं होतं. यानंतर पंतप्रधान मोदींनी आकांक्षा ठाकूरला पत्र लिहीलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षाला लिहीलेल्या पत्रात तिला आशीर्वाद दिले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी लिहीलं की, "प्रिय आकांक्षा, शुभेच्छा आणि आशीर्वाद. कांकेर कार्यक्रमात तू माझ्यासाठी आणलेले स्केच माझ्यापर्यंत पोहोचले आहे. या प्रेमळ अभिव्यक्तीबद्दल खूप खूप आभार. भारताच्या मुली या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. तुम्हा सर्वांकडून मिळालेले हे प्रेम आणि आपुलकी हीच देशसेवेच्या कामातील माझी शक्ती आहे. आपल्या मुलींसाठी एक निरोगी, सुरक्षित आणि सुसज्ज राष्ट्र निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे."

पीएम मोदींनी पत्रात काय लिहिले?

पीएम मोदींनी पत्रात पुढे लिहिले की, छत्तीसगडच्या लोकांकडून मला नेहमीच खूप प्रेम मिळाले आहे. देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत राज्यातील जनतेनेही उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. पुढची २५ वर्षे तुमच्या सारख्या तरुण मित्रांसाठी आणि देशासाठी महत्त्वाची असणार आहेत. या वर्षांत आपली तरुण पिढी, विशेषत: तुमच्यासारख्या मुली त्यांची स्वप्ने पूर्ण करतील आणि देशाच्या भविष्याला नवी दिशा देतील. पीएम मोदींनी लिहिले की, तु खूप अभ्यास कर, पुढे जा आणि तुमच्या यशाने तुमच्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला गौरव मिळवून द्या. मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

छत्तीसगड मध्ये 2 नोव्हेंबरला कांकेरमध्ये झालेल्या पीएम मोदींच्या निवडणूक रॅलीसाठी शहरात राहणारे दिनेश ठाकूर हे त्यांची १० वर्षांची मुलगी आकांक्षा ठाकूर हिला घेऊन आले होते. येथे आकांक्षा ठाकूरने पीएम मोदींचे स्केच आणले होते. स्केच पाहिल्यानंतर पीएम मोदींनी त्याचे कौतुक केले आणि त्यांना नक्कीच पत्र लिहिणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा! ईडीची केस बंद; प्रकरण काय?

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकीकडे ८७ लाखांची सायबर फसवणूक, तर दुसरीकडे लाखोंचे दागिने अन् रोकड लंपास

Pune News: सकाळी साडेअकराची बैठक थेट दुपारी चारनंतर! पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची टीका

Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..

Gangapur News: अंगणवाडी सेविका अंजली तूपलोंढे यांच्या निधनाने हळहळ; आमदार प्रशांत बंब यांनी कुटुंबीयांचे घरी जाऊन केले सांत्वन

SCROLL FOR NEXT