modi and xi jinping Sakal
देश

PM Modi Xi Jinping Meet : चीनच्या विनंतीनुसारच नरेंद्र मोदी-जिनपिंग भेट

चीनने भारतासोबत द्विपक्षीय बैठकीसाठी विनंती

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या अटकळबाजीच्या पार्श्वभूमीवर सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे, की ही भेट अनौपचारिक आणि चीनने केलेल्या विनंतीच्या आधारे होती.

या बैठकीसाठी भारताने विनंती केली होती, असा दावा चीनकडून झाल्यानंतर भारत सरकारचा हा खुलासा समोर आला आहे. या भेटीदरम्यान प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणावाचा मुद्दा पंतप्रधान मोदींनी चीनच्या अध्यक्षांकडे उपस्थित केला.

सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनने भारतासोबत द्विपक्षीय बैठकीसाठी विनंती केली होती. परंतु, ब्रिक्स परिषदेदरम्यान लीडर्स लाउंजमध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अनौपचारिक बातचीत झाली.

याआधी मागील वर्षी बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या जी-२० परिषदेच्या बैठकीदरम्यान मोदी आणि शी जिनपिंग यांची चर्चा झाली होती. काही महिन्यानंतर या भेटीबद्दल भारत सरकारतर्फे दुजोरा देण्यात आला होता.

जी-२० शिखर परिषद दिल्लीत ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन, यांच्यासह जी-२० समूहातील अन्य राष्ट्रप्रमुखांचा सहभाग अपेक्षित आहे. अर्थात, रशियाचे अध्यक्ष पुतीन हे या परिषदेत सहभागी होणार नसून रशियन सरकारतर्फे याबद्दलची औपचारिक घोषणा आज करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT