PM Narendr Modi flags off 8 trains connecting to Statue of Unity 
देश

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ रेल्वेच्याही नकाशावर; केवाडियाला जोडणाऱ्या आठ रेल्वेगाड्या सुरू

पीटीआय

अहमदाबाद -‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ झालेल्या गुजरातमधील केवाडियाचे नाव आता रेल्वेच्याही नकाशावर आले आहे. केवाडियाला जोडणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. 

मोदी यांनी व्हिडिओ लिंकद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. केवाडियाला भारतभरातील पर्यटकांना येणे सोयीचे जावे, यासाठी रेल्वेगाड्या सुरु करतानाच मोदी यांनी तीन रेल्वे स्थानकांचेही उद्‌घाटन केले. ते म्हणाले, ‘‘एकाच ठिकाणाला जोडणाऱ्या इतक्या रेल्वेगाड्यांचे प्रथमच एकाच वेळी उद्‌घाटन झाले असावे.  आज केवाडिया हे गुजरातमधले छोटेसे गाव राहिलेले नाही. नवीन रेल्वे मार्गांमुळे स्थानिक लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. रेल्वे ही पर्यावरणपूरक असावी, या केंद्र सरकारच्या धोरणाचे नवीन केवाडिया रेल्वे स्थानक हे उदाहरण आहे.’’

यांचेही उद्‌घाटन  
   तीन नवीन रेल्वे स्थानके : दाभोई, केवाडिया, चंदोद 
    दाभोई-चंदोद ब्रॉड गेज
    चंदोद -केवाडिया ब्रॉड गेज
    विद्युतीकरण झालेला प्रतापनगर- केवाडिया मार्ग

ही शहरे केवाडियाला जोडली जाणार
अहमदाबाद, वाराणसी, मुंबई, हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली), रेवा, चेन्नई, प्रतापनगर (बडोदा).

‘लिबर्टी’ला टाकले मागे
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या भव्य पुतळ्याला २०१८ पासून जवळपास ५० लाख पर्यटकांनी भेट दिली. याबाबतीत अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’लाही मागे टाकले आहे.  केवाडियाला जोडणारे जाळे आता समृद्ध झाले असल्याने भविष्यात या ठिकाणी दररोज एक लाख पर्यटक भेट देतील, असे मोदी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT