Narendra modi narendra modi
देश

शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस! PM मोदी खात्यात जमा करणार पैसे

कार्तिक पुजारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज शेतकऱ्यांना खुष करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) नववा हफ्ता आज ते जाहीर करतील.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज शेतकऱ्यांना खुष करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) नववा हफ्ता आज ते जाहीर करतील. कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव सुरु असताना मोदींनी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. पंतप्रधान आज (9 ऑगस्ट) साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगद्वारे पीएम किसान निधीची घोषणा करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिलीये. पीएम किसान निधी योजनेंतर्गत 19,500 कोटी रुपये 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. (National Latest Marathi News)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी मदतीचा नवा हफ्ता 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता जाहीर करण्यात येईल. पंतप्रधान मोदींच्या घोषणेमुळे 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये जमा होतील. पीएमओ कार्यालयाने निवेदनात ही माहिती दिलीये.

पीएम-किसान योजना काय आहे?

पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा केले जातात. चार महिन्यातून एकदा शेतकऱ्यांना खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातात. वर्षातून तीनवेळा म्हणजे तीन हफ्त्यात ही रक्कम मिळते. माहितीनुसार, या योजनेंतर्गत आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याआधी मे महिन्यात 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आलीये.

पीएम-किसान योजना केंद्राची

पीएम-किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन शेतकरी या योजनेसाठी आपले नाव नोंदवू शकतो. लाभार्थी कोणाला ठरवायचं याबाबत निर्णय राज्य सरकारवर सोडण्यात आला आहे. लाभार्थींची यादी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येते. त्यानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते. ही योजना केंद्राची असून सरकार यासाठीचा खर्च उचलते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काही लाभार्थ्यांशी चर्चा करतील. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हेही उपस्थित असतील अशी माहिती देण्यात आलीये.

PM Kisan योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पाहाल?

1. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईला https://pmkisan.gov.in भेट द्या.

2. होम पेजवर उजव्या बाजूला Farmers Corner असा पर्याय आहे.

3. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करा

4. आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.

5. लाभार्थ्यांची पूर्ण यादी तुम्हाला दिसेल. यात तुमचे नाव पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT