देश

ना'पाक' कारवायांचा मोदींनी केला पर्दाफाश

वृत्तसंस्था

बिश्‍केक (किर्गिझस्तान) : येथील "शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन'च्या संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत पुन्हा एकदा पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. भारतासाठी त्रासदायक ठरलेल्या दहशतवादावर पाकने कठोर कारवाई करावी, असे मत मोदींनी या वेळी मांडले. मोदी आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माध्यमांसमोर मांडला. दरम्यान, मोदींनी या वेळी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली. 

"पाकिस्तानने दहशतमुक्त वातावरण तयार करायला हवे. या परिस्थितीमध्ये आम्हाला ते घडताना दिसत नाही,'' असे मत मोदी यांनी जिनपिंग यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान मांडले. ""आम्ही आतापर्यंत शांततेसाठी खूप प्रयत्न केले; पण ते फसले. आम्ही अपेक्षा करतो की, पाकिस्तानने दहशतवादावर कठोर कारवाई करावी. भारत पूर्वीच्या भूमिकेवर ठाम असून, आम्हाला पाकिस्तानसोबत शांततापूर्ण संबंध हवेत आहेत,'' असेही मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितल्याचे गोखले म्हणाले. जिनपिंग यांच्यासोबतची चर्चा अतिशय फलदायी होती, असे मोदी यांनी म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दलही जिनपिंग यांनी मोदींचे स्वागत केले. जिनपिंग यांचा पंधरा जून रोजी वाढदिवस असून, त्या पार्श्‍वभूमीवर मोदींनीही त्यांना ऍडव्हान्स शुभेच्छा दिल्या. "वुहानमधील बैठकीनंतर दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांमध्ये कमालीचे स्थैर्य आले असून, दोन्ही बाजूंच्या रणनीतीक संवादामध्येही प्रगती झाल्याचे दिसून येते. यामुळे दोन्ही देश परस्परांच्या हितसंबंधांबाबत कमालीचे संवेदनशील झालेले दिसून येतात. दोन्ही देशांसाठी सहकार्याची नवी क्षेत्रे खुली झाली आहेत,'' असेही मोदी यांनी जिनपिंग यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. 

भारतभेटीचे निमंत्रण स्वीकारले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले भारतभेटीचे निमंत्रणही जिनपिंग यांनी या वेळी स्वीकारले. ते या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षी वुहान येथे झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. पुढील द्विपक्षीय चर्चादेखील यशस्वी होईल, असा आशावाद भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT