pm Narendra modi and us president President Joe Biden to hold virtual meet tomorrow  facebook
देश

PM मोदी अन् US राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात उद्या व्हर्चुअल बैठक

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युध्दाच्या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत व्हर्चुअस बैठक घेणार आहेत. या बैठकीत दोन्ही नेते सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) रविवारी सांगितले.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन दक्षिण आशियातील अलीकडील घडामोडी, इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवरही चर्चा करतील. द्विपक्षीय सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने व्हर्चुअल बैठक महत्वाची ठरणार आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरेल असे मानले जात आहे.

दरम्यान 11 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर बायडन यांच्याशी व्हर्चुअल बैठक घेतील.हे दोन्ही नेते सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील आणि दक्षिण आशियातील अलीकडील घडामोडी, इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

भारत-अमेरिका यांच्यात 2+2 मंत्रिस्तरीय बैठक होईल ज्याचे नेतृत्व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि MEA एस जयशंकर भारताच्या बाजूने करतील आणि त्यांचे यूएस समकक्ष, संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन हे या चर्चेत सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT