Narendra Modi Visits Assam sakal
देश

मोदींची आज आसाम भेट; 7 कॅन्सर हॉस्पिटलची करणार पायाभरणी

कार्बी आंगलोंग या जिल्ह्यातील दिफूमध्ये शांती, एकता आणि विकास रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम या राज्याला भेट देणार आहेत. कार्बी आंगलोंग या जिल्ह्यातील दिफूमध्ये शांती, एकता आणि विकास रॅलीचे आयोजन करण्यात आलं असून सभेमध्ये ते जनतेला संबोधित करणार आहेत अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

(PM Narendra Modi Visit Assam)

मोदी दिफू येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय, पश्चिम कार्बी आंगलाँग येथील पदवी महाविद्यालय आणि कोलोंगा, पश्चिम कार्बी आंगलाँग येथे कृषी महाविद्यालयाची पायाभरणी करणार असल्याची माहिती दिली आहेत. 500 कोटींहून अधिक किंमतीचे हे प्रकल्प या प्रदेशात कौशल्य आणि रोजगाराच्या नवीन संधी आणतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 2950 हून अधिक अमृत सरोवर प्रकल्पांची पायाभरणी करतील. हे अमृत सरोवर राज्यात सुमारे 1150 कोटी रुपये खर्चून विकसित केले जाणार आहेत असंही पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार आणि आसाम सरकारने कार्बी अतिरेकी संघटनांसोबत नुकत्याच केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यामुळे या प्रदेशाच्या शांतता आणि विकासासाठी मदत होणार आहे. या सामंजस्य कराराने ईशान्येत शांततेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. 'शांती, एकता आणि विकास रॅली'मधील पंतप्रधानांचे भाषण संपूर्ण प्रदेशातील शांतता उपक्रमांना चालना देणार असल्याची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी दुपारी डिब्रूगढ कॅन्सर मेडिकल कॉलेज येथे जाणार असून त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर डिब्रूगढ येथील खनिकर मैदानात मोदींची एक सभा होणैर आहे. डिब्रूगढ येथील कॅन्सर हॉस्पिचलच्या लोकार्पणासोबतच पंतप्रधान मोदी आज नव्या ७ कॅन्सर हॉस्पिटलची पायाभरणी करणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमध्ये नवं कांड! तुरुंगात मदतीसाठी 'ओली पार्टी', ३ अधिकाऱ्यांनी आरोपींसोबत ढोसली दारू; तोतया IPSने आयोजन केल्याचा संशय

IPL 2026, MI vs RR: रोहित शर्मानंतर फक्त 'सूर्या'! मुंबई इंडियन्ससाठी 'असा' विक्रम फक्त दोघांच्याच नावावर

Pune Adhik Maas Darshan Yatra : अधिक मासनिमित्त ST ची भाविकांना पर्वणी; पुणे विभागाकडून गणपतीपुळेसह तुळजापूर-गाणगापूर विशेष पॅकेज टूर सेवा सुरू

Video : नंदिनीचा खोटेपणा होणार आईसमोर उघड! मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकही चक्रावले

Solapur: ZP अध्यक्षांना २० हजार, सभापतींना १२ हजार मानधन; पदाधिकाऱ्यांच्या प्रवास भत्ता अन् इंधनासाठी लाखोंची तरतूद

SCROLL FOR NEXT