देश

QUAD | नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना

अमेरिकेबरोबर व्यापक अशी आंतरराष्ट्रीय धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी हा दौरा महत्वाचा असल्याचे मोदी यांनी सांगितले.

ओमकार वाबळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय समीटसाठी रवाना झाले आहेत. महामारीच्या दरम्यान पंतप्रधान त्यांच्या पहिल्या मोठ्या परदेशी दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.

हा दौरा अमेरिकेबरोबर व्यापक अशी आंतरराष्ट्रीय धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी महत्वाचा असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या QUAD ग्रुपची बैठक या ठिकाणी होणार आहे. त्यावर बोलताना, आमचे सामरिक भागीदार म्हणजेच जपान आणि ऑस्ट्रेलियाशी संबंध दृढ करण्यासाठी आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर आमचे सहकार्य पुढे नेण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे मोदींनी म्हटले. अमेरिकेसाठी रवाना होण्यापूर्वी मोदींनी पत्रकारांना संबोधन केले.

मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर महत्वाच्या भेटीगाठी घेणार आहेत. जवळपास दोन वर्षे महामारीच्या सावटाखाली काढल्यानंतर आता पुन्हा काही आंतरराष्ट्रीय दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. व्हाईट हाऊसमध्ये मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतील, असे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

व्हीपी कमला हॅरिस आणि आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका पार पडणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आधी शृंगला म्हणाले, "पंतप्रधान मोदी उद्या (बुधवार) सकाळी निघतील आणि 26 सप्टेंबरला परत येतील. कोरोना महामारी दरम्यान त्यांची ही पहिली मोठी परदेशी भेट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये होणारी भेट हा एक महत्वाचा मुद्दा असेल. राष्ट्रपती बिडेन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची ही पहिली वैयक्तिक भेट आहे. दोन्ही नेते गेल्या काही महिन्यांपासून नियमित संपर्कात आहेत", असे वक्तव्य भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

RTO Employee Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचे अस्त्र; 'या' तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय, कारण काय?

Mumbai Crime: कांदिवली मेट्रो स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लिफ्टमध्ये धक्कादायक प्रकार, एकटीला गाठून केलं विचित्र कृत्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

SCROLL FOR NEXT