56 inch thali Sakal
देश

PM Modi Birthday: दिल्लीत '५६ इंच' थाळी; साडे आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

या थाळीसोबत केदारनाथ यात्राही बक्षीस म्हणून मिळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या म्हणजे १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये एक विशेष थाळी तयार करण्यात आली आहे. या थाळीमध्ये ५६ पदार्थ असतील, ज्यामध्ये व्हेज-नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचे पदार्थ ग्राहकांना मिळणार आहेत.

दिल्लीतल्या कनॉट प्लेस इथल्या ARDOR 2.1 या हॉटेलमध्ये ही थाळी मिळणार आहे. या विषयी बोलताना या हॉटेलचे मालक सुमित कलारा यांनी सांगितलं की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करतो. ते आपल्या देशाची शान आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना एक अनोखी भेट देऊ इच्छितो. म्हणून आम्ही एका भव्य थाळी निर्माण करत आहोत. या थाळीचं नाव ५६ इंच असं असेल. आम्ही ही थाळी त्यांना भेट देऊ इच्छितो आणि आमची इच्छा आहे की त्यांनी इथे येऊन खावी. पण सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही असं करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थकांना विनंती करतो की ज्यांचं मोदींवर प्रेम आहे, त्यांनी यावं आणि या थाळीचा आस्वाद घ्यावा.

हॉटेलच्या मालकाने या खास थाळीवर अनेक बक्षिसंही ठेवली आहेत. जर कोणत्याही जोडप्यापैकी एकाने ही थाळी ४० मिनिटांच्या आत संपवली, तर त्या व्यक्तीला साडे आठ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. तसंच या थाळीवर केदारनाथ यात्राही बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये जाऊन आपल्या आईचा आशिर्वाद घेतील. त्यानंतर ते मध्यप्रदेशला जातील, तिथे कूनो नॅशनल पार्कमध्ये जातील जिथे नामिबियातून ८ चित्ते आणले जाणार आहेत. तर भाजपाकडून पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: जालन्यात शिंदेसेनेला मोठं भगदाड! सर्व तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, कार्यपद्धीवर नाराज

IND U19 vs PAK U19: सेहवाग-द्रविड स्वस्तात बाद, पण अर्जुन राजपूतचं खणखणीत शतक; भारताच्या पाकिस्तानविरुद्ध २०० धावा पार

Pimpri Chinchwad Water Cut : रावेतमध्ये नदीतून बेकायदा पाणीउपसा पाणीचोरीवर कारवाईचा बडगा; अनधिकृत यंत्रणा हटविण्याचे आदेश

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला कणकेच्या दिव्याने का ओवाळतात? जाणून घ्या ४ धार्मिक मान्यता

Latest Marathi News Live Update: श्रीनगरमध्ये सक्रिय असलेल्या चार वॉन्टेड दहशतवाद्यांचे फोटो जारी

SCROLL FOR NEXT