PM Modi Birthday 
देश

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना तुम्हीही देऊ शकता थेट वाढदिवसाच्या शुभेच्छा; जाणून घ्या कसं

PM narendra Modi Birthday Here How You Can Wish The Prime Minister Directly: अभियानात सहभागी होण्यासाठी नमो अॅप डाऊनलोड करावे लागेल. यात मोबाईल क्रमांक किंवा ईमेलआयडीच्या माध्यमातून तुम्ही रेजिस्ट्रेशन करु शकता

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंधप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून नमो अॅपवर 'सेवा पखवाडा' (Seva Pakhwada) अभियान सुरु करण्यात आले आहे. सेवा पखवाडा अभियानात ६ अॅक्टिविटिजचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय नागरिक या अभियानात सहभागी होऊ शकतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा थेट देऊ शकतात. (PM narendra Modi Birthday Here How You Can Wish The Prime Minister Directly)

अभियानात सहभागी होण्यासाठी नमो अॅप डाऊनलोड करावे लागेल. यात मोबाईल क्रमांक किंवा ईमेलआयडीच्या माध्यमातून तुम्ही रेजिस्ट्रेशन करु शकता. त्यानंतर सेवा पखवाडा या बॅनरवर क्लिक करा. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरु असणार आहे.

सेवा पखवाडा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यात व्हर्च्युअल एक्झिबिशन कॉर्नर, व्हिडिओ शुभकामना, फॅमिली ई-कार्ड सेवा, प्रगती पथ पर भारत आणि भारत सपोर्ट मोदी या अॅक्टविटिजचा समावेश आहे.

व्हर्च्युअल एक्झिबिशन कॉर्नर

तयार केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी 'युवा नमो'वर क्लिक करा

तुमच्या स्वत:चा व्हिडिओ तयार करण्यासाठी 'पीएम स्टोरी'वर क्लिक करा

पाच ते दहा फोटो निवडा आणि क्रियेट स्टोरी म्हणा

व्हिडिओ शुभकामना टू मोदी

सेवा पखवाडा होमपेजवरुन व्हिडिओ शुभकामनावर क्लिक करा

अपलोड व्हिडिओवर क्लिक करुन तुमचा व्हिडिओ अपलोड करा

शुभेच्छा देण्याची कॅटेगरी निवडा आणि व्हिडिओ पोस्ट करा

नागरिक व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करु शकतात

फॅमिली ईकार्ड टू मोदी

फॅमिली ई कार्ड बॅनरवर क्लिक करा

त्यानंतर क्रियेट फॅमिली कार्डवर क्लिक करा

तुमच्या आवडीचे टेम्पेट निवडा

तुमच्या कुटुंबियांची नावे टाका आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा संदेश लिहा आणि नेक्स्टवर क्लिक करा

ईकार्ड व्हिडिओ तुम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करु शकता

प्रगती पथ पर भारत

हमे चलते जाना है सेक्शनमध्ये तुम्हाला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विकास पावत असलेल्या स्थळांची निवड करावी लागेल, त्यानंतर तुम्ही ते सोशल मीडियावर शेअर करु शकतात.

भारत सपोर्ट मोदी

हमे चलते जाना है सेक्शनवर क्लिक करा

येथे मॅप दिसेल, ज्यात लोक कोठे सेवा देत आहेत ते दिसेल

टायटलवर क्लिक करुन मॅपवरील फोटो तुम्ही पाहू शकता

फोटो शेअर करा आणि इतर लोकांनाही सेवा करण्यास प्रोत्साहन देऊ शकता (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT