PM Narendra Modi Birthday  esakal
देश

Narendra Modi : PM मोदींना वाढदिवसानिमित्त तुम्हीही 'शुभेच्छा' पाठवू शकता; फक्त 'हे' काम करावं लागेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येत आहे. तुम्हालाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायच्या असतील, तर सोशल मीडियावरच एक खास मार्ग आहे. यावर्षी तुम्ही 'नमो अॅप'द्वारे पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

यासह 'नमो अॅप'वर एक नवीन मॉड्यूल लॉन्च करण्यात आलंय. त्याला 'सेवा का उपहार' असं नाव देण्यात आलंय. याद्वारे देशातील कोणताही नागरिक आपला संदेश पंतप्रधानांना पाठवू शकणार आहे. या अॅपद्वारे तुमचा संदेश थेट पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचेल.

जाणून घ्या तुम्ही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा पाठवू शकता

Namo App च्या माध्यमातून तुम्ही पंतप्रधान मोदींना ई-कार्ड (E-card) किंवा व्हिडिओद्वारे शुभेच्छा संदेश पाठवू शकता. तुम्ही नमो अॅप उघडताच, तुम्हाला पीएम मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी सूचना दिसेल. पुढं जाण्यासाठी फक्त त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा या शुभेच्छा संदेशात समावेश करू शकता.

शुभेच्छा संदेशासह सेवेची शपथ घ्या

यासोबतच एक खास गोष्टही जोडलेली आहे. म्हणजेच, या शुभेच्छा संदेशासह समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात सेवा करण्याची शपथ घेऊन आणि त्याचा व्हिडिओ बनवून तुम्ही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही पर्यावरण वाचवण्याची शपथ घ्या, टीबीमुक्त भारताची शपथ घ्या, रक्तदानाची शपथ घ्या, डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्याची शपथ घ्या, स्वच्छ भारतासाठी योगदान देण्याची शपथ घ्या आणि व्हिडिओ बनवून तुम्ही नमो अॅपवर देखील अपलोड करू शकता. हा व्हिडिओ थेट पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही थेट पंतप्रधानांशी संपर्क साधू शकाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT