PM Narendra Modi Birthday Blood Donation Camp esakal
देश

Blood Donation : PM मोदींच्या वाढदिनी 'जागतिक विक्रम'; एक लाखाहून अधिक लोकांनी केलं 'रक्तदान'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी जनतेनं त्यांना खास गिफ्ट दिलंय.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी जनतेनं त्यांना खास गिफ्ट दिलंय.

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी जनतेनं त्यांना खास गिफ्ट दिलं. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या रक्तदान मोहिमेत (Blood Donation Camp) लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि जागतिक विक्रम केला. या एका दिवसात एक लाखाहून अधिक लोकांनी रक्तदान केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिलीय.

यापूर्वी 2014 मध्ये एकाच दिवसात 87,059 लोकांनी रक्तदान केलं होतं. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आरोग्य मंत्री मांडविया यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी 15 दिवसांची रक्तदान मोहीम सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी एक लाखाहून अधिक लोकांनी रक्तदान केलं, हा एक 'वर्ल्ड रेकॉर्ड' आहे. यापूर्वी 6 सप्टेंबर 2014 रोजी 87,059 जणांनी रक्तदानात सहभागी होऊन विक्रम केला होता.

तीनशे शहरांत 556 रक्तदान शिबिरं

हा कार्यक्रम अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेनं आयोजित केला होता आणि त्यासाठी भारतातील तीनशे शहरांमध्ये 556 रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली होती. मांडविया यांनी स्वतः दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमधील एका शिबिरात रक्तदान केलं होतं आणि लोकांना 'रक्तदान अमृत महोत्सवा'वर रक्तदान करण्यासाठी आरोग्य सेतू अॅप (Aarogya Setu App) किंवा ई-रक्तकोश पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं.

रक्त अमृत महोत्सव म्हणजे काय?

या मोहिमेची सुरुवात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच, 17 सप्टेंबर रोजी झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ही मोहीम 15 दिवस चालणार आहे. रक्तदान करण्यास इच्छुक असलेले लोक रक्तपेढीच्या पोर्टलवर नोंदणी करू शकतात. यासाठी आरोग्य सेतू अॅपवरही नोंदणी करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT