PM Modi Upvas eSakal
देश

PM Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदींनी मोदींनी केलं 11 दिवसांच्या व्रताचे उद्यापन, असा सोडला उपवास.. पाहा व्हिडिओ

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मोदींनी 11 दिवसांचा उपवास ठेवला होता.

Sudesh

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उपवासही संपन्न झाला आहे. गोविंद देव गिरी महाराजांच्या हस्ते चरणामृत प्राशन करुन मोदींनी हा उपवास सोडला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मोदींनी 11 दिवसांचा उपवास ठेवला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 13 जानेवारीपासून खास व्रत सुरू केलं होतं. या व्रतानुसारच पुढील 11 दिवस आपली दिनचर्या असणार असल्याचं मोदींनी घोषित केलं होतं. गोविंद देव गिरी महाराजांनी याबाबत पंतप्रधानांचं कौतुक केलं. पंतप्रधानांनी स्वतःच अनुष्ठानाची नियमावली मागितली होती. तीन दिवसांच्या उपवासाचा पर्याय असतानाही त्यांनी तब्बल 11 दिवसांचा उपवास पूर्ण केला; असंही त्यांनी म्हटलं.

यावेळी बोलताना गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, की 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा क्षण पहायला मिळाला आहे. राम या देशाचा आत्मविश्वास आहे. देशात अशा प्रकारचं परिवर्तन आणण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन कार्य करावं लागतं. हे कार्य पीएम मोदींनी केलं आहे.

आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून मोदी मिळाले, हे देशाचंच नाही तर संपूर्ण जगाचं सौभाग्य आहे. त्यांच्या मंगल हातांनी आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. हे स्वाभाविकच होतं. पूर्ण 11 दिवस पंतप्रधानांनी अनुष्ठानाचे पालन केलं हे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटलं, असंही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT