

Hasan Mushrif on satej patil
Esakal
Kolhapur Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षात आता नवे अपडेट समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना थेट ऑफर दिली आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी सतेज पाटील यांनी फॉर्म्युला द्यावा, आम्ही त्यांना रोखलेले नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सतेज पाटील कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.