PM Modi
PM Modi esakal
देश

New Delhi : केंद्र-राज्य विज्ञान सम्मेलन- मोदी

मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : २१ व्या शतकातील भारताच्या विकासात विज्ञान-तंत्रज्ञान ही ऊर्जा असून त्यात देशातील प्रत्येक राज्याच्या विकासाला गती देण्याची ताकद आहे. देश चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असताना विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधितांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

पहिल्या केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे सुरू झालेल्या या दोन दिवसीय संमेलनात व्हिजन २०४७ सह विविध विषयासंबंधीच्या सत्रांचा समावेश असेल. मोदी म्हणाले की जेव्हा आपल्याला ज्ञान आणि विज्ञानाची ओळख होते, तेव्हा जगातील सर्व संकटांपासून मुक्तीचा मार्ग आपोआप उघडतो. विज्ञान हा उपाय आणि नवनिर्मितीचा आधार आहे. याच प्रेरणेने आजचा नवा भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान तसेच जय अनुसंधान हा नारा देत स्वातंत्र्याच्या अमृतकाळात अग्रेसर आहे. भारताला संशोधन आणि नवनिर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी स्थानिक पातळीवरही काम करावे लागेल.

मोदी म्हणाले

-२०१४ नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अर्थसंकल्पीय तरतुदीसह या क्षेत्राच्या गुंतवणुकीतही भरीव वाढ झाली आहे.

- भारताला वैज्ञानिक संशोधन आणि नवनिर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी आपल्याला एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करावे लागेल.

- विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आपले संशोधन स्थानिक पातळीवर नेले पाहिजे.

- राज्य सरकारांनी अधिकाधिक वैज्ञानिक संस्था निर्माण करण्यावर आणि प्रक्रिया सुलभ करण्यावर भर दिला पाहिजे.

- राज्यांमधील उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवोपक्रमाच्या प्रयोगशाळांची संख्या वाढायला हवी.

- मागील शतकातही, सर्वत्र शास्त्रज्ञ त्यांच्या महान शोधात गुंतले होते.

- गेल्या शतकातील सुरुवातीची दशके जग विनाश आणि शोकांतिकेच्या काळातून जात होते. पण त्या काळातही पूर्व असो वा पश्चिम, सर्वत्र शास्त्रज्ञ त्यांच्या महान शोधात गुंतले होते.

- पाश्चिमात्य देशातील आइन्स्टाईन, फर्मी, मॅक्स प्लँक, नील्स बोहर, टेस्ला यांसारखे शास्त्रज्ञ ज्या काळात नवसंशोधनांनी जगाला चकित करत होते त्या काळात सीव्ही रमण, जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा, एस चंद्रशेखर यांच्यासह अनेक भारतीय शास्त्रज्ञही आपले नवनवीन शोध जगासमोर आणत होते.

- आमचे सरकार विज्ञानावर आधारित विकासाच्या विचाराने काम करत आहे.

-आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे २०१५ मध्ये ८१ च्या क्रमांकाच्या तुलनेत आज भारत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये ४६ व्या क्रमांकावर पोचला आहे.

या संमेलनात बिहार व झारखंड ही दोन राज्ये सहभागी झालेली नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार बिहार झारखंड वगळता इतर सर्व राज्य सरकारे या परिषदेत सहभागी आहेत. या परिषदेत केंद्र आणि राज्य सरकार, आघाडीचे उद्योगपती, तरुण शास्त्रज्ञ आणि नवसंशोधक सहभागी होत आहेत. बिहार आणि झारखंड सरकारांच्या प्राधान्यक्रमात विज्ञान आणि नवनिर्मिती नाही का त्यांना केंद्राकडून रीतसर निमंत्रण मिळालेले नाही असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT