देश

ओमिक्रॉनची रुग्णवाढ; PM मोदींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक सुरु

महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या संसर्गबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आजच्याघडीला देशात ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या २८४ वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाचं वाढतं प्रमाणं हे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देऊ शकतं या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली ओमिक्रॉन आढावा बैठक राजधानीत सुरु आहे. या बैठकीला नीती आयोगाचे (Niti Aayog) सदस्य उपस्थित आहेत.

मोदींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दक्षता समिती नेमण्याची सूचना केली असून कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सणांनिमित्त होणाऱ्या गर्दीत कोविड नियमावलीचं योग्य पालन होतंय की नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच कन्टेन्मेंट झोन तयार करण्याच्या आणि नाईट कर्फ्यू लावण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी १०० टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही केंद्रानं दिल्या आहेत. त्याचबरोबर वॉररुम पुन्हा सज्ज करा आणि कोविडच्या ट्रेन्ड्सच्या बदलाचं निरिक्षण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT