pm narendra modi critisize congress over medha patkar joining rahul gandhi bharat jodo yatragujrat election  
देश

Bharat Jodo Yatra: मेधा पाटकरांचा सहभाग काँग्रेससाठी अडचणीचा? गुजरातमध्ये मोदींना मिळाला मुद्दा

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत मेधा पाटकर यांच्या सहभागावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गुजरातमधील धोराजी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी काँग्रेस कोणत्या नैतिक आधारावर गुजरातमध्ये मते मागत आहे. यांच्या नेत्याच्या भारत जोडो यात्रेत नर्मदा धरण प्रकल्प तीन दशकांपासून रखडवून ठेवणाऱ्या एका महिलेचा समावेश होता असे म्हटले आहे.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर शनिवारी महाराष्ट्रात राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला उशीर झाला कारण या प्रकल्पाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "कच्छ आणि काठियावाडच्या कोरड्या प्रदेशाची तहान भागवण्यासाठी नर्मदा प्रकल्प हा एकमेव उपाय होता. नर्मदा प्रकल्पाचे काम तीन दशके ठप्प करणाऱ्या महिलेने कायदेशीर अडथळे निर्माण केले, काँग्रेस नेता तिच्यासोबत पदयात्रा करत आहे. इथपर्यंत पाणी पोहोचू नये म्हणून त्या महिलेने विरोध केला. या लोकांनी गुजरातची इतकी बदनामी केली की जागतिक बँकेने प्रकल्पाला निधी देणे बंद केले होते."

पंतप्रधानांनी सभेत उपस्थित लोकांना मत मागण्यासाठी आलेल्या काँग्रेस नेत्यांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, जेव्हा काँग्रेसचे नेते तुमच्याकडे मते मागायला येतात, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचे प्रश्न विचारावेत, अशी माझी इच्छा आहे. त्यांना विचार की ते कोणत्या नैतिकतेच्या आधारावर मते मागायला आले आहेत, जेव्हा की त्यांचे नेते त्या महिलेसोबत पदयात्रा करता आहेत जी नर्मदा प्रकल्पाला विरोध करत होती, हे तुम्ही त्यांना विचारा.

मोदी म्हणाले की, गुजरातमधील भाजप सरकारने पाणीटंचाई दूर करण्यासाठी 20 वर्षे मेहनत केली. त्यासाठी अनेक प्रकल्पांवर काम करण्यात आले. चेकडॅम, विहिरी, तलाव खोदण्याचे प्रकल्प आणले. पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले. आज संपूर्ण कच्छ-काठियावाड प्रदेशाला या पाइपलाइन नेटवर्कद्वारे पाणी मिळत आहे.

गुजरात में एक आणि पाच डिसेंबर रोजी दोन सत्रांत मतदान होईल. गुजरात मध्ये एकूण 182 जागांपैकी 89 जागांवर 1 डिसेंबर आणि 93 जागांवर 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT