PM Modi France Visit eSakal
देश

PM Modi France Visit : पंतप्रधान मोदी फ्रान्सला रवाना; बॅस्टिल डे परेडला राहणार उपस्थित, विविध करारांची शक्यता

या दौऱ्यामध्ये फ्रान्ससोबत संरक्षण, अंतराळ आणि इतर काही क्षेत्रांबद्दल करार देखील होतील.

Sudesh

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांना बॅस्टिल डे परेडच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. १४ जुलै रोजी या परेडला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

फ्रान्सच्या अध्यक्षांना भेटून, दोन्ही देशांमधील दीर्घकालीन संबंध पुढे नेण्यासाठी विस्तृत चर्चा करणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. या दौऱ्यामध्ये फ्रान्ससोबत संरक्षण, अंतराळ आणि इतर काही क्षेत्रांबद्दल करार देखील करतील. यासोबतच, भारत-फ्रान्स संबंध आणखी दृढ करण्यावर भर दिला जाईल.

भारतीय समुदाय उत्सुक

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भारतीय समुदाय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. आपण पंतप्रधानांना एक खास पगडी भेट देणार असल्याचंही या नागरिकांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती मिळताच आपण स्वागताची तयारी सुरू केल्याचं भारतीय गुजराती सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष जयेश भावसे यांनी सांगितलं.

बॅस्टिल डे परेडमध्ये भारतीय तुकडी

फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडच्या दिवशी भारताच्या तिनही दलांतील मिळून २६९ सदस्य फ्रान्सच्या सैनिकांसोबत परेड करतानाचा ऐतिहासिक क्षण १४ जुलैला बघायला मिळेल. त्याचबरोबर भारतीय वायुसेनेतील ४ राफेल चॅम्प्स एलिसीच्या वरुन फ्लायपास्ट करणार आहेत.

संरक्षण करार

फ्रान्स भारतासाठी दीर्घकाळापासून एक महत्त्वाचा संरक्षण भागीदार आहे. त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याला खूप महत्त्व आहे. या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये आयएनएस विक्रांतसाठी २६ राफेल-एम विमाने आणि स्कॉर्पिन पाणबुड्या विकत घेण्याविषयी करार अपेक्षित आहेत.

भारत-फ्रान्स संबंध

भारत आणि फ्रान्समध्ये असलेल्या धोरणात्मक भागीदारीचं हे २५ वं वर्धापन वर्ष आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भविष्यातील संबंधांसाठी रोडमॅप तयार होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

BABAR AZAM: पहिल्या टेस्टमधून बाहेर, पण आता कमबॅकसाठी सज्ज? बाबर आझमच्या फिटनेसवर पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने दिली मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा जोर धरणार, हवामान विभागाचा अंदाज

Congress on Caste Census: जातगणना प्रक्रियेला काँग्रेसचा तीव्र विरोध ;खर्गे, राहुल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

SCROLL FOR NEXT