PM Narendra Modi is the destroyer of the many temples says mahant 
देश

'मोदींनीच तोडली सर्वांत जास्त मंदिरं'

वृत्तसंस्था

वाराणसी : प्रसिद्ध पत्रकार आतिश तासिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक मोठा आरोप करत ट्विट केले आहे. गझनीनंततर सर्वात जास्त मंदिरं तोडणारे मोदी आहेत, असे एका महंताने म्हणले आहे, असा थेट आरोप तासिर यांनी केला आहे. 

एका महंतांचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरमंदिर तोडण्याचा आरोप तासिर यांनी केला आहे. तासिर यांनी वाराणसीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराचे फोटो शेअर करत ट्विट केले आहे. त्यामध्ये, औरंगजेबाला तर विसराच, काशी विश्वनाथ मंदिरातील एका महंतांनी असं म्हटलंय, असे लिहिलं आहे. तसेच, गझनीनंतर इतर कुठल्याही व्यक्तीने एवढी मंदिरं तोडली नसतील जेवढी, मोदींनी तोडली आहेत, असे म्हटले आहे.  

तासिर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ते महंत वाराणसी येथे सरकारद्वारे बनविण्यात येत असलेल्या कॉरिडोअरसंदर्भात बोलत आहेत. केवळ एक स्मारक बनविण्यासाठी शहराचा आत्मा असलेल्या भागाला नष्ट करण्यात येत आहे, असे महंतांचे म्हणणे असल्याचेही तासिर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. वाराणसीतील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडोर बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कॉरिडोअर बनविण्यासाठी या परिसरातील घरे आणि लहान-मोठी मंदिरे काढण्यात आली आहेत. गंगा नदीकाठच्या ललिता घाट आणि मणकर्णिका घाट येथून ते काशी विश्वनाथ मंदिरपर्यंत हा कॉरिडोअर बनविण्यात येत आहे. या निर्माण प्रक्रियेत ज्या लोकांची घरे पडली आहेत, ते या कॉरिडोअरला आपला विरोध दर्शवत आहेत. तसेच, मंदिर काढण्यात येत असल्याने अनेक महंत आणि पुजारीही नाराज असल्याचं समजते. मात्र, सरकारकडून केवळ अतिक्रमण हटविण्यात येत असल्याचं सागिंतलं जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT