Narendra Modi 
देश

Narendra Modi: भाजप हा फक्त हिंदी पट्ट्यातील पक्ष आहे का?; नरेंद्र मोदींनी दिले सडेतोड उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत अनेक विषयावर भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देत आज भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात असल्याचे सांगितले.

Sandip Kapde

Narendra Modi: भाजप दक्षिणेकडील कोणत्याही राज्यात सत्तेत नाही. यापैकी बहुतेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. त्यामुळे भाजप हा फक्त हिंदी पट्ट्यांचा पक्ष आहे का?, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका मुलाखतीत करण्यात आला. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप संदर्भता प्रत्येक मुद्द्यांवर भाष्य केले.

नरेंद्र मोदी म्हणाले, भाजप हा फक्त हिंदी पट्ट्यांचा पक्ष आहे, असं मूल्यांकन चुकीचं आहे. भाजपच्या स्थापनेपासून आम्ही कोण आहोत आणि कशाचे प्रतिनिधित्व करतो, असे अनेक प्रश्न विचारल्या जातात. कधी कधी तर आम्हाला ब्राह्मण-बनिया पक्ष म्हटले जायचे, तर कधी  फक्त हिंदी पट्ट्याबद्दल बोलणारा पक्ष म्हटले जाते. मात्र निवडणुकीनंतर हे सर्व चुकीचं असल्याचे आम्ही सिद्ध केले.

आज देशाचा एकही कोपरा नाही जिथे आमच्या पक्षाला पाठिंबा मिळत नाही. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते अनेक राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांपर्यंत आमचा पक्ष लोकांमध्ये जोमाने काम करत आहे. बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमध्ये आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहोत. बिहारच्या जनतेने आम्हाला खंबीर पाठिंबा आणि जनादेश दिला होता. सहा महिन्यांपूर्वी कर्नाटकात आमचे सरकार होते. आजही पुद्दुचेरीत आपले सरकार आहे. सध्या 16 राज्यात आमची सत्ता आहे आणि आठ राज्यात प्रमुख विरोधी पक्ष आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

दक्षिण भारताचा विचार केला तर लोकसभेच्या जागांच्या बाबतीत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. लोकसभेच्या दोन जागांपासून (1984 मध्ये) झालेल्या विनम्र सुरुवातीपासून ते आता 303 पर्यंतचा आमचा प्रवास विचारात घ्या. देशाच्या सर्व भागांतील लोकांच्या पाठिंब्याशिवाय आपण राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण शक्ती म्हणून उदयास येऊ शकलो असतो का?, असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर देखील नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. मोदी म्हणाले, भाजप हा केडर आधारित पक्ष आहे. सामान्य मतदान केंद्रावर देखील भाजपकडे वचनबद्ध कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. प्रत्येक स्तरावर आमच्याकडे नेतृत्व आहे. त्यामुळे निवडणुकांच्याल विजयाचे श्रेय मला देणे चुकीचे ठरेल. याचे श्रेय आमच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या मेहनतीला जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT