PM Narendra Modi esakal
देश

PM Narendra Modi: "परवानगी देता येणार नाही", PM मोदींच्या ताफ्यातील 3 वाहनांची मुदत संपल्यावर NGT ची कठोर भूमिका

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या वाहनातील तीन गाड्यांची रस्त्यावर चालवण्याची मुदत संपली आहे.

Sandip Kapde

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या वाहनातील तीन गाड्यांची रस्त्यावर चालवण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे या वाहनांची मुदत वाढवावी अशी मागणी करत स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (SPG) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) कडे याचिका केली होती. ह्या तीन गाड्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे मुदत वाढवावी अशी मागणी SPG ने केली होती. मात्र NGT ने ही याचिका फेटाळली आहे.

याचिका का फेटाळली?

अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि तज्ञ सदस्य डॉ. ए सेंथिल वेल यांचा समावेश असलेल्या एनजीटीच्या मुख्य खंडपीठाने एसपीजीचा अर्ज फेटाळला. यावेळी त्यांनी  ऑक्टोबर २०१८ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला. त्यानुसार दिल्ली आणि एनसीआरच्या रस्त्यावर १० वर्ष जुनी डिझेल गाडी चालवण्यास मनाई आहे.

NGT ने काय म्हटलं?

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सांगितले की आम्हाला माहिती आहे की त्या तीन गाड्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या आहेत. ते वाहने सामान्यत: उपलब्ध देखील नाहीत. १० वर्षात ही वाहने फार कमी देखील चालेले आहेत. मात्र सर्वोच्य न्यायालयाच्या २०१८ मधील आदेशामुळे आम्ही SPG चा अर्ज मान्य करु शकत नाही.

SPG ने काय म्हटलं होतं?

SPG ने  परिवहन विभाग, NCT दिल्ली/नोंदणी प्राधिकरण पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या ताफ्यातील ३ वाहनांची मुदत पाच वर्ष म्हणजे २३ डिसेंबर २०२९ पर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. कारण ही वाहने स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप टेक्निकल लॉजिस्टिकचा अत्यावश्यक आणि अविभाज्य भाग आहेत.

ह्या तीन गाड्या २०१३ मध्ये बनवण्यात आल्या होत्या. २०१४ मध्ये त्याची नोंदणी करण्यात आली. ही वाहने तीन रेनॉल्ट एमडी-५ विशेष चिलखती वाहने आहेत. डिसेंबर २०२९ पर्यंत १५ वर्षांच्या कालावधीसाठी नोंदणीकृत या वाहनांची डिसेंबर २०२४ मध्ये १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या २०१८ च्या आदेशानुसार नोंदणी रद्द केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

Latest Marathi News Update LIVE : “कात्रज-नवले पुलाचा नवा प्रकल्प; विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री उदय सामंत”

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

SCROLL FOR NEXT