Narendra Modi No Money for Terror esakal
देश

दहशतवादानं भारताला दुखावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याविरुद्ध धैर्यानं लढलो - PM मोदी

'अनेक दशकांपासून दहशतवादानं आपल्या देशाला दुखावण्याचा प्रयत्न केला, पण..'

सकाळ डिजिटल टीम

'अनेक दशकांपासून दहशतवादानं आपल्या देशाला दुखावण्याचा प्रयत्न केला, पण..'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नो मनी फॉर टेरर' (No Money for Terror) या आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) देखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, ही परिषद भारतात होत आहे. अनेक दशकांपासून दहशतवादानं आपल्या देशाला दुखावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याविरुद्ध धैर्यानं लढलो, असं ते म्हणाले.

दहशतवादाचा (Terrorism) नायनाट होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. दीर्घकाळापासून दहशतवादाचा गरीब आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मग ते पर्यटन असो की व्यावसायिक क्षेत्र. त्यामुळं लोकांची रोजीरोटी हिरावून घेतली जात आहे. दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावर आपण प्रहार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

यापूर्वी एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या परिषदेत सहभागी होणार नाहीत. याशिवाय, चीनकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या परिषदेत 15 हून अधिक मंत्र्यांसह 73 देशांचे प्रतिनिधी सर्व मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चा करतील. मग ते दहशतवादाचं स्रोत, धमक्या किंवा त्याचा निधी असो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर दहशतवादी फंडिंगसाठी केला जात आहे. भारताकडे याचे पुरावे आहेत, असंही गुप्तांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT