देश

सशक्त सरकारची कल्पना ‘एनडीए’ने बदलली - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी : तमिळनाडूतील अण्णा विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) सरकारने सशक्त सरकारने प्रत्येक व्यक्तीवर आणि प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवले पाहिजे, ही संकल्पना बदलली आहे. एनडीए सरकारने नवीन मार्ग तयार केले, पायाभूत सुविधांना चालना देत क्षेत्रीय सुधारणांचीही गती वाढविली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. तमिळनाडूतील अण्णा विद्यापीठाच्या ४२ व्या पदवीप्रदान कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, राज्यपाल आर.एन.रवी आदी यावेळी उपस्थित होते

पंतप्रधान यावेळी म्हणाले, की कोणतेही सशक्त सरकार प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्तीला नियंत्रित करू शकत नाही. ते स्वत:ला मर्यादित करून लोकांच्या बुद्धिमत्तेला अवकाश उपलब्ध करून देते. आपण प्रत्येक गोष्ट करू शकत नाही, या विनम्रतेतच सशक्त सरकारची खरी ताकद असते. त्यामुळेच, देशात प्रत्येक क्षेत्रात सुधारणा दिसत आहेत.

ज्यात, स्वातंत्र्यासाठी आणि लोकांसाठी मोठे स्थान आहे. ते यंत्रणेचा हस्तक्षेप करण्याची ऊर्मी नियंत्रित करू शकते. सशक्त सरकार प्रतिबंधात्मक नसते तर प्रतिसादात्मक असते. आपल्या सरकारने जवळपास २५ हजार परवानग्या रद्द केल्याने राहणीमान सुलभ होत आहे. त्याचप्रमाणे, पूर्वलक्षी कर व कार्पोरेट कर कमी करत सरकार गुंतवणूक व उद्योगांना प्रोत्साहन देत आहे. ड्रोन, अवकाश आणि भू-स्थानिक क्षेत्रांत सुधारणांचे नवीन मार्ग तयार होत आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात पंतप्रधान गतीशक्ती योजनेतून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अभूतपूर्व कोरोना साथीचाही भारताने वैज्ञानिक व नागरिकांच्या जोरावर आत्मविश्वासाने सामना केला, असेही त्यांनी नमूद केले.

नावीन्यता ही आता जीवन जगण्याची पद्धत बनत आहे. देशात गेल्या सहा वर्षांत स्टार्टअपची संख्या १५ हजार टक्क्यांनी वाढली आहे. २०१६ मध्ये भारतात केवळ ४७० स्टार्टअप होते. ते आता जवळपास ७३ हजारांवर पोचले आहेत. उद्योग व नावीन्यता चांगली कामगिरी करतात तेव्हा गुंतवणूक होते. गेल्या वर्षी भारतात विक्रमी ८३ अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झाली.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT