Narendra Modi esakal
देश

Narendra Modi Video : चिमुकल्यांसोबत नरेंद्र मोदींच्या गप्पा; एक तर म्हणाला, तुमच्यासारखं व्हायचंय अन्...

संतोष कानडे

Karnataka Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (मंगळवार) पंतप्रधान मोदींनी लहान मुलांसोबत गप्पा मारल्या आणि चिमुकल्यांना बोटांच्या वेगवेगळ्या अटकळी करायला लावल्या.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांना भिडले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून विषारी साप, असा उल्लेख केल्याने वातावरण गरम झालं आहे.

काँग्रेसने आतापर्यंत आपल्याला अशा ९२ शिव्या दिल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला असून तोच मुद्दा घेऊन ते प्रचार करत आहेत. आज कलबुर्गी येथे रॅलीदरम्यान त्यांनी लहान मुलांशी जरावेळ गप्पा मारल्या.

पंतप्रधानांना समोर बघताच चिमुकली हरखुन गेली होती. मोदींनी सुरुवातीला हाताच्या बोटांचा खेळ केला. असं करुन दाखवा..तसं करुन दाखवा असं म्हणत तसंच मुलांना करायला लावलं. त्यानंतर त्यांनी कोण मोठं झाल्यानंतर काय बनणार? असे प्रश्न विचारले.

पंतप्रधानांचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. एक मुलगा त्यांना म्हणतो, मला डॉक्टर व्हायचंय. दुसरा म्हणतो मला पोलिस व्हायचंय. त्यावर पंतप्रधानांनी कुणाला पंतप्रधान व्हायचं नाही का? असं विचारलं. त्यावर एकाने म्हटलं की, तुमच्यासारखं व्हावं, असं वाटतंय. त्यानंतर सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं.

कलबुर्गी येथे आज पंतप्रधानांनी रोड शो केला. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधला. हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. कर्नाटकमध्ये सत्ताधारी पक्षाला संधी न देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे यावेळी कर्नाटकचे लोक भाजपला नाकारणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळेच भाजपचे शीर्षस्थ नेते कर्नाटकात ठाण मांडून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT