PM Modi Speech eSakal
देश

PM Modi Speech : 'भारत देश आता 6G साठी तयार'; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन घोषणा!

6G in India : पंतप्रधान मोदींनी यावर्षी मार्च महिन्यातच 6G व्हिजन डॉक्युमेंट लाँच केलं होतं.

Sudesh

Independence Day 2023 : आज देशाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी लाल किल्ल्यावरुन बोलताना त्यांनी देश विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं. बदलत्या जगाला आकार देण्यात 140 कोटी भारतीयांचं सामर्थ्य दिसत आहे, असं ते म्हणाले.

6G साठी तयार

टेक्नॉलॉजी क्षेत्रातही भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. गेल्या वर्षी देशात 5G तंत्रज्ञान लाँच करण्यात आलं होतं. आता आपला देश 6G साठी देखील तयार असल्याचं पंतप्रधान मोदी आज म्हणाले.

6G व्हिजन डॉक्युमेंट

पंतप्रधान मोदींनी यावर्षी मार्च महिन्यातच 6G व्हिजन डॉक्युमेंट लाँच केलं होतं. यासोबतच त्यांनी 6G रिसर्च अँड डेव्हलपमेंट टेस्ट बँड लाँच केलं होतं. देशात हे नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी या डॉक्युमेंट्सचा फायदा होणार आहे. (Independence Day)

भारताचं टेक-दशक

"सध्याचं दशक हे भारतासाठी टेक-दशक आहे. भारताचं टेलिकॉम आणि डिजिटल मॉडेल हे स्मूथ, सिक्युअर, ट्रान्सपॅरंट, ट्रस्टेड आणि टेस्टेड आहे." असं पंतप्रधान मोदी या 6G व्हिजन डॉक्युमेंटच्या लाँचिंगवेळी म्हणाले होते. टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुपने हे डॉक्युमेंट तयार केलं आहे. देशात 6G साठी रोडमॅप तयार करण्याचं काम हा ग्रुप करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT