PM Narendra Modi esakal
देश

PM Narendra Modi: 'नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत'; 'त्याने' देवी कालीला बोलला नवस, बोट कापून केलं अर्पण

PM Narendra Modi: कर्नाटकमधील ही घटना आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून एका व्यक्तीने नवस बोलला. मात्र त्याच्या नवसाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Sandip Kapde

PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. भाजपने पुन्हा नरेंद्र मोदी यांचा चेहरा लोकांसमोर आणला आहे. त्यामुळे 2024 ची निवडणूक भाजप नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करुन लढणार असल्याचे स्पष्ट झाले. कारण नरेंद्र मोदींचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. कर्नाटकमध्ये तर एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी प्रार्थना करताना डाव्या हाताची तर्जनी कापली (index finger) आणि ती देवी कालीला अर्पण केली.


ही अनोखी घटना शनिवारी उघडकीस आली. कारवार शहरातील सोनारवाडा परिसरात हा प्रकार घडला. अरुण वेर्णेकर असे नरेंद्र मोदी यांचा निष्ठावंत भक्ताचे नाव आहे. IANS वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

वेर्णेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर देखील बांधले आहे आणि नियमितपणे विशेष पूजा करतात.हाताचे बोट कापल्यानंतर त्यांनी घराच्या भिंतीवर रक्ताने माँ काली माता, मोदी बाबांचे रक्षण कर...

मोदी बाबा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, भिंतीवर मोदी बाबा महान आहेत, असे देखील त्यांनी भिंतींवर लिहिलेले दिसले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण वेर्णेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आल्यानंतरच चीन आणि पाकिस्तान यांच्यामुळे निर्माण झालेल्या समस्या संपल्या आहेत.

यापूर्वी काश्मीरमधून दहशतवादी कारवाया आणि जवानांच्या मृत्यूच्या बातम्या येत होत्या, पण आता हा परिसर शांत आहे. देशाच्या विकासासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे, असे अरुण वेर्णेकर म्हणाले.

अरुण वेर्णेकर यांनी यापूर्वी मुंबई चित्रपटसृष्टीत काम केले होते. सध्या तो कारवार शहरात राहतो आणि आपल्या वृद्ध आईची काळजी घेतो. तो अविवाहित आहे. याआधी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी बोट कापण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. मात्र, यावेळी त्याचे बोट कापण्यात यश आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT