नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलबच्चन असल्याचे अनेकदा टीका म्हणून बोलले जाते. "इकॉनॉमिक टाइम्स' वृत्तपत्राने याचा खरोखरीच शोध घेतला आणि मोदी हे महिन्याला सरासरी 19 भाषणे देत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातुलनेत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची दर महिन्याला भाषणाची सरासरी ही 11 च येत आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 41 महिन्यात तब्बल 775 जाहीर भाषणं केली आहेत. प्रत्येक महिन्याला मोदींनी सरासरी 19 भाषणं दिल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच दर तीन दिवसांपैकी दोन दिवस त्यांनी जाहीर सभांमधून भाषण केल्याचं म्हणू शकतो. बहुतेक भाषणं ही किमान 30 मिनिटांची होती.
त्याउलट मनमोहनसिंग यांनी 10 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत 1 हजार 401 भाषणे दिली. म्हणजेच महिन्याला सरासरी 11 भाषणे दिली. पण अवघ्या तीन वर्षात मोदींनी भाषणबाजीत मनमोहनसिंग यांना मागे टाकले आहे. लाल किल्यावरून स्वातंत्र्यदिनी लांबलचक भाषण केल्याचा विक्रमही मोदी यांच्या नावावर आहे.
अर्थात मोदी हे भाजपचे स्टार प्रचारक असल्याने त्यांची भाषणाची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात आले. तसेच भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार मोदी हे "लीडर' आहेत. मनमोहनसिंग हे फक्त "रिडर' होते. त्यामुळे मोदींच्या भाषणांची संख्या त्यांच्यापेक्षा जास्तच असणार, असाही युक्तिवाद करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तर मोदी यांनी तीनशेहून अधिक सभा घेतल्याचेही सांगण्यात आले.
मोदींच्या सभा..!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.