Narendra Modi 
देश

PM मोदींनी जॉईन केलं व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल; जाणून घ्या त्यांना कसे फॉलो करायचं?

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन केले आहेत. या चॅनलद्वारे तुम्ही थेट पंतप्रधान मोदींशी कनेक्ट होऊ शकता. सोशल मेसेजिंग अ‍ॅपमध्ये हे फिचर नुकतेच अपडेट करण्यात आले आहे.

WhatsApp चॅनेल अ‍ॅडमीनला मजकूर, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि पोल प्रसारित करण्याची परवानगी देते. नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना चॅनेल फॉलो करू शकतात.

वापरकर्त्याने चॅनेल फॉलो केल्यास, त्याचा फोन नंबर चॅनल अ‍ॅडमीन किंवा इतर फॉलोअर्सला दिसणार नाही. याशिवाय चॅनल अ‍ॅडमिनिस्ट्रेटरला स्क्रीनशॉट आणि फॉरवर्ड ब्लॉक करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवरील पहिल्या पोस्टमध्ये, पीएम मोदी म्हणाले, "व्हॉट्सअ‍ॅप समुदायात सामील होण्यासाठी उत्सुक आहे! आमच्या सतत संवादाच्या प्रवासातील हे आणखी एक पाऊल आहे. चला येथे कनेक्ट राहूया! नवीन संसद भवनाचे हे चित्र आहे..."

मंगळवारी दुपारी व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी संसदेच्या नवीन इमारतीतील त्यांच्या कार्यालयात कामात मग्न दिसत आहेत. पोस्टवर काही मिनिटांत सुमारे 200 प्रतिक्रिया आल्या आहेत. पंतप्रधानांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलचे 17,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.

मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलने अलीकडेच टेलीग्राम प्रमाणेच एक नवीन चॅनेल वैशिष्ट्य जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने सेलिब्रिटी स्वतःचे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल तयार करू शकतात आणि सामान्य वापरकर्ते त्यांच्याशी थेट कनेक्ट होऊ शकतात. व्हॉट्स अ‍ॅपमध्ये चॅनल हा पर्याय दिसत असून तिथं विविध सेलिब्रेटींची चॅनल आपल्याला दिसतात. तिथंच वापरकर्ते सेलिब्रेटींना फॉलो करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT