narendra modi 
देश

शाळा सोडल्यापासून गरबा खेळलो नाही...; PM मोदींनी डिपफेक व्हिडिओवरून फटकारले, ChatGpt ला दिले 'हे' आदेश

Sandip Kapde

नवी दिल्ली: डीपफेक व्हिडिओ तयार करण्यासाठी Artificial Intelligence च्या गैरवापरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिंता व्यक्त केली. तसेच ही मोठी चिंता असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी भाजपच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांना संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की त्यांनी ChatGpt टीमला डीपफेक व्हिडिओ काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच असे व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित केले जातात तेव्हा चेतावणी देण्यास सांगितले आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, “मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये मी गातोय. माझ्यावर प्रेम असलेल्या अनेक लोकांनी तो फॉरवर्ड केला आहे."

तसेच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये मी गरबा खेळताना दाखवले आहे पण शाळा सोडल्यापासून गरबा खेळला नाही, असे देखील नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

माध्यमातील लोकांनी या संकटाबद्दल लोकांना जागृत केले पाहीजे. डीपफेक व्हिडिओ तयार करणे आणि प्रसारित करणे यासाठी 1 लाख दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास, अशी शिक्षा असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी अनेक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ आणि काजोलच्या मॉर्फ केलेल्या चेहऱ्यांसह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे प्रचंड संताप निर्माण झाला होता.

या प्रकरणी केंद्राने पीडितांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा आणि माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार प्रदान केलेल्या उपायांचा लाभ घ्या, असा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, चुकीची माहिती पसरवण्यापासून रोखण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी कायदेशीर बंधन आहे. सरकार नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा खूप गांभीर्याने घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT