lok sabha election 2024 pm narendra modi rahul gandhi nda india esakal
देश

PM Modi : 'पंतप्रधान मोदींना 80 टक्के भारतीयांचं समर्थन', अमेरिकन सर्व्हेत राहुल गांधींसाठीही गुड न्यूज

संतोष कानडे

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी १० पैकी ८ भारतीयांची मतं चांगली आहेत. मोदी देशासाठी चांगलं काम करीत आहेत, असा विश्वास ८० टक्के लोकांना वाटत आहे. अमेरिकेतल्या थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्व्हेमधून ही बाब समोर आलीय.

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच लोकप्रिय असल्याचं निष्पन्न होत आहे. सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या १० पैकी ७ भारतीयांना असं वाटतंय की, पूर्वीपेक्षा आता जगावर भारताचा प्रभाव जास्त पडला आहे. भारताची आर्थिक स्थिती कमकूवत असल्याचं १९ टक्के लोकांना वाटतंय. तर १३ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, भारताच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

काँग्रेस नेते राहुल गांधींविषयी सर्व्हेक्षणामधून चांगली बाब पुढे आलेली आहे. १० पैकी ६ भारतीयांना राहुल गांधींविषयी अपेक्षा आहेत. ते चांगलं काम करतील, असं त्यांना वाटतंय. विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधींच्या कामावर १० पैकी ६ लोक समाधानी आहेत.

राहुल गांधींच्या भूमिकेमुळे प्रभावीत न झालेल्या लोकांची टक्केवारी ३४ टक्के इतकी आहे. अमेरिकेच्या थिंक टँक प्यु रिसर्च सेंटरने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये भारतीयांसोबतच भारताबाहेरील लोकांचीही मतं घेण्यात आलेली आहेत. त्यानुसार इतर देशांमधील लोकसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकप्रिय नेता मानत असल्याचं स्पष्ट होत आहे. 'लाईव्ह हिंदुस्तान'ने या सर्व्हेक्षणासंबंधीचे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT