Narendra Modi 
देश

देवाने मला असं बनवलंय, कोणी शिव्या दिल्या की त्याचं रुपांतर पोषकतत्वात होतं : मोदी

सकाळ डिजिटल टीम

हैद्राबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधी पक्षांचे नेते आपल्याला शिव्या देतात, पण त्या शिव्यांचा वापर आपण पोषकतत्व म्हणून करतो, असा टोला मोदींनी लगावला. (pm narendra modi news in Marathi)

पंतप्रधान म्हणाले की, निराशा आणि हताश झाल्यामुळे काही लोक सकाळ-संध्याकाळी मला शिवीगाळ करत असतात. परंतु यामुळे मला काहीही फरक पडत नाही. मात्र विरोधकांनी तेलंगणातील लोकांना शिव्या घातल्या तर त्यांना परिणाम भोगावे लागतील.

तेलंगणात भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी दररोज दोन-तीन किलो शिव्या खातो. देवाने माझ्यात अशी शक्ती निर्माण केली की मला कोणी शिव्या दिल्या की, त्या शिव्यांचे रुपांतर पोषकतत्वात होते. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी उर्जा जनतेच्या सेवेसाठी मी वापरतो, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जे लोक मला रात्रंदिवस शिव्या देतात, ते नवनवीन शिव्यांचा शोध घेत राहतात. मला कितीही शिव्या दिल्या तरी मी पचवू शकतो. तुम्ही भाजपला शिवीगाळ करा काही अडचण नाही. पण तेलंगणाच्या जनतेला शिव्या घातल्या तर तुम्हाला शिव्या खाव्या लागतील, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT