Narendra Modi esakal
देश

Parliament Session : ''रडारड करु नका, अधिवेशनात ऐतिहासिक..'' संसदेत दाखल होण्यापूर्वी मोदी माध्यमांशी बोलले

संतोष कानडे

नवी दिल्लीः संसदेचं विशेष अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये हे सत्र भरवण्यात येत असून संसदेत दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, भारताचा तिरंगा चंद्रावर अभिमानाने फडकत आहे. चांद्रमोहीम यशस्वी झाल्याने जगभरात भारताचा सन्मान वाढलाय. तसेच आपण जी २० परिषद यशस्वी करुन दाखवलेली आहे, त्यामुळे भारताचा गौरव होत आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताच्या उज्ज्वल भविष्याचा काळ सुरु झाला आहे. काल विश्वकर्मा जयंती होती. देशातल्या विश्वकर्मा समूदायाचा जो परंपरागत व्यवसाय आहे तो त्यांना आधुनिक पद्धतीने करता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे, देशात नवीन आत्मविश्वास आपण अनुभव करत आहोत.

संसदेच्या विशेष सत्राबद्दल बोलताना मोदी म्हणाले, सत्र छोटं आहे परंतु वेळेच्या हिशोबाने मोठे निर्णय होणार आहेत. हे ऐतिहासिक निर्णयाचं सत्र असून नवे संकल्प, नवी ऊर्जा, नवा विश्वास यातून मिळणार आहे. त्यामुळे नेहमीची रडारड सोडून अधिवेशनात जास्तीत जास्त वेळ द्यावा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

ते पुढे म्हणाले की, वाईटपणा सोडून चांगुलपणाची कास धरत नवीन संसद भवनामध्ये प्रवेश करणं महत्त्वाचं आहे. उद्या गणेश चतुर्थीचं पावण पर्व सुरु होत आहे. नव्या भारताच्या स्वप्नांना आता बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

Shendurwada News : जप्त केलेला जेसीबी रात्रीच गायब; महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारावर प्रश्नचिन्ह?

Manchar Accident : मंचरमध्ये भीषण अपघात; युवक ठार, युवती गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT